नवी दिल्ली: उत्कृष्ट तिमाही निकालामुळे खूष झालेल्या आयटी कन्सल्टिंग फर्म अ‍ॅक्सेन्चरने आपल्या कर्मचार्‍यांना बोनस जाहीर केला आहे. मॅनेजिंग डायरेक्टर स्तराखालील सर्व कर्मचार्‍यांना बोनस देण्यात येतील असे अ‍ॅक्सेन्चरने ठरवले आहे. एका बाजुला कोरोनामुळे कंपन्याचे उत्पन्न ठप्प झाल्याने पगार कपात झालीय. त्यात बोनस मिळणं खूप दुरची गोष्ट आहे. अशावेळी अ‍ॅक्सेन्चरने कंपनीच्या कर्मचार्‍यांसाठी चेहऱ्यावर आनंद देणारी आहे.


कर्मचार्‍यांवर बोनसचा वर्षाव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना व्हायरस (Coronavirus)कालावधीत कर्मचार्‍यांच्या योगदानाच्या पार्श्वभूमीवर एक्सेंचरने हा बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने सर्व कर्मचार्‍यांना वन-टाइम बोनस म्हणून आठवडाभराचा मूलभूत पगार जाहीर केला आहे. या निर्णयाचा फायदा भारतात कार्यरत कंपनीच्या सुमारे 2 लाख कर्मचार्‍यांनाही होणार आहे. या आव्हानात्मक वर्षाच्या काळात कर्मचार्‍यांचे अभूतपूर्व योगदान आणि ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा निर्णय घेतल्याचे  कंपनीने आपल्या आर्थिक सहाय्य अहवालात म्हटले आहे.



उत्कृष्ट कामगिरीची भेट


28 फेब्रुवारी रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत Accentureची कमाई 8 टक्क्यांनी वाढून 12.09 अब्ज डॉलरवर गेली आहे, तर कंपनीचा एकूण महसूल दुसऱ्या तिमाहीत १.46 अब्ज डॉलर्स होता, तर गेल्या वर्षी याच तिमाहीत १.25 अब्ज डॉलर्स होता. 


मागील वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीने यंदाच्या नवीन बुकिंगमध्ये 13% वाढ नोंदविली असून ती 16 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे.


कोरोना लस देखील विनामूल्य 


एक्सेन्चरच्या आधी पहिली कन्सल्टींग फर्म पीडब्ल्यूसीने देखील आपल्या सर्व कर्मचार्‍यांना एक-वेळ बोनस जाहीर केला. पीडब्ल्यूसी बोनस कर्मचार्‍यांच्या दोन आठवड्यांच्या पगारा इतका होता. काही निवडक कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना विनामूल्य कोरोना लस लागू करण्याची घोषणा केली आहे.  Accenture देखील अशा निवडक कंपन्यांपैकी एक आहे.