शोरुममध्येच Mahindra Thar ची टेस्ट ड्राईव्ह ; पुढे असं काही झालं की जेसीबीनं तारलं...
पाहा असं कधी तुमच्यासोबत घडलंय का...
मुंबई : Mahindra Thar या ऑफरोडिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या गाडीप्रती असणारं वेड आपण जाणतो. थार खरेदी करण्याचं तसं अनेकांचं स्वप्न. पण, प्रत्यक्षात जेव्हा हे स्वप्न साकार होतं, त्यावेळी होणारा आनंद हा शब्दांतही मांडता येणार नाही, असाच असतो.
हाच आनंद किंवा उत्साह जेव्हा मर्यादा ओलांडतो तेव्हा काय भानगड होते, याची प्रचिती नुकतीच आली.
जिथे एका अतिउत्साही ग्राहकाने थारची डिलीव्हरी घेतली आणि शोरुममध्येच त्यानं याची टेस्ट ड्राईव्ह घेण्यास सुरुवात केली.
बंगळुरूतील हा ग्राहक ड्रायव्हिंग सीटवर बसून कार बाहेर नेऊ पाहत होता. तेव्हाच त्याचा ताबा सुटला आणि शोरुमपुढे लागलेल्या ग्रीलवर ही थार आदळली.
रेलिंगनं वाचवली थार... नाहीतर..
या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल होऊ लागले. आता नेमकी चालकानं चूक केली की शोरूम मधील कर्मचाऱ्यांनी ही बाब अद्यापही समोर आलेली नाही.
इथं लक्ष देण्याजोगी बाब अशी की थारचं फार नुकसान झालं नाही. शोरुमला असणाऱ्या रेलिंगमुळं अनर्थ टळला.
शोरुंची काच तोडून ही कार पुढे आली आणि रेलिंगवर आदळली. मग काय, पुढची चाकं हवेत... आणि मागची तिथेच अडकलेली.
सदर घटनेनंतर जेसीबीच्या मदतीनं थारला पूर्वपदावर आणण्यात आलं. काही क्षणांतच ती शोरुममध्ये परतली.
आता इथे लक्ष देण्याजोगी बाब अशी, की तुम्हीही अशा कोणत्या कारची डिलीव्हरी घेण्यासाठी जाताय, तर उत्साहाला वेसण घाला. कारसाठी मोजलेली किंमत लक्षात ठेवून तिथल्या मंडळींकडून दिलं जाणारं मार्गदर्शन ऐका...