भयंकर! अशी चूक करणं जीवघेण ठरू शकतं, या बाईकस्वारासोबत काय घडलं पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर पोस्ट केलेला हा धक्कादायक व्हिडीओ गुजरातमधील दाहोदचा असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई : आपण जर सोशल मीडिया उघडला तर, आपल्याला त्यावर काही ना काही नवीन पाहायला मिळते. यामध्ये काही फोट असतात, काही व्हिडीओ, तर काही मीम्स असतात. हे आपले नेहमीच मनोरंजन करत असतात. सोशल मीडियावरील काही गोष्टी आपल्याला माहिती पुरवतात, तर काही आपले मनोरंजन करतात तर काही खूपच धक्कादायक असतात. सोशल मीडियावर आपण लोकांच्या मूर्ख पणामुळे घडलेल्या किंवा काही वेळेला अचानक झालेल्या अपघातांचा व्हिडीओ देखील पाहातो, हे व्हिडीओ आपल्या अंगावर काटे उभे करतात.
अशा अपघातांमुळे लोकांना आपला जिव गमवावा लागतो, तर काही लोकं आयुष्य भरासाठी अपंग होतात. परंतु काही वेळेला असा काही चमत्कार घडतो की, आपला आपल्या डोळ्यांवरती विश्वास देखील बसत नाही.
ते म्हणतात ना 'देव तारी त्याला कोण मारी', म्हणजे देव ज्याच्या मदतीला उभा असतो, त्याचं कोणीही काही वाकडं करु शकणार नाही. याच वाक्याला सिद्ध करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर पोस्ट केलेला हा धक्कादायक व्हिडीओ गुजरातमधील दाहोदचा असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक दुचाकीस्वार एका मोठ्या अपघातातूनही बचावतो. या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते की, हायस्पीड बस महामार्गावर जात आहे, नंतर अचानक दुचाकीस्वार एका वळणावर ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतो. परंतु तेव्हा अचानक त्याला मागून बस धडक देते आणि हा दुचाकीस्वार बसखाली येतो.
हे दुश्य पाहून तुम्हाला काही सेकंदांसाठी तरी असे वाटते की, तरुण बसखाली येऊन वाईट रीतीने चिरडला गेला असावा. परंतु काही वेळाने हा तरुण बस खालून सुखरूप बाहेर आला. हे पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही की, खरोखर हा तरुण या भयानक अपघातातून जिवंत वाचला आहे. त्यानंतर त्या महामार्गावरुन जाणारे लोकं त्या तरुणाला बाजूला येण्यास आणि त्याची मदत करण्यासाठी पुढे येतात.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक म्हणाले की, याला म्हणतात खरे नशीब. हा दुचाकीस्वार जवळ-जवळ त्याच्या मृत्यूला पाहून परत आला आहे. यावर एका यूजरने सांगितले की, रस्ते अपघात नेहमीच घातक असतात, परंतु प्रत्येकजण इतका भाग्यवान नसतो. काही लोकांनी सांगितले की, जरी व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती भाग्यवान आहे, परंतु बहुतेक लोक अशा अपघातात आपले प्राण गमावतात, मग आपण रस्त्यावर नेहमी सावधगिरी बाळगणे जास्त महत्त्वाचे आहे.