वास्तुशास्त्रात एखादी गोष्टी कशा आणि केव्हा कराव्यात याची पद्धत सविस्तरपणे सांगण्यात आल्या आहेत. वास्तुशास्त्रात आणि वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये नेहमीच घर स्वच्छ ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. याशिवाय घरामध्ये वस्तू योग्य दिशेला ठेवल्या नाहीत तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वास्तूनुसार झाडू आणि मोप घरात न ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. वास्तुशास्त्रानुसार झाडू आणि मोप कोणत्या दिशेला ठेवावेत. वास्तुशास्त्रानुसार पूजेच्या घरात, स्वयंपाकघर आणि बेडरूममध्ये झाडू ठेवू नये. घराच्या उत्तर-पश्चिम किंवा पश्चिम दिशेला झाडूचा मोप ठेवा. झाडू ईशान्य किंवा दक्षिण-पूर्व दिशेला ठेवू नये.


झाडू सर्वांच्या नजरे पासून दूर ठेवा
झाडू आणि मोप घरात लपवून ठेवावा. लक्षात ठेवा की झाडू कधीही उभा किंवा उलटा ठेवू नका. झाडू नेहमी पाडून ठेवला पाहिजे.
जुना किंवा तुटलेला झाडू कधीही वापरू नका, जुना झाडू शनिवारी बदलावा. असं केल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो. बेडरुममध्ये झाडू आणि मोप कधीही ठेवू नका कारण याने घरात तणाव निर्माण होतो. पती-पत्नीमध्ये कडाक्याचं भांडणं होऊ शकतं.


या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
संध्याकाळी कधीही घरात झाडू मारू नका आणि तुमचा वापरलेला झाडू कोणालाही देऊ नका. यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याचा धोका असतो.


जुना झाडू कधी फेकावा
घरामध्ये जुने आणि तुटलेले झाडू वापरू नये असे मानले जाते. जुना झाडू शनिवार, अमावस्या किंवा होलिका दहनाच्या दिवशी बाहेर काढावा. जुने झाडू घराबाहेर काढल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते.


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Z24 तास याची पुष्ठी करत नाही.)