बरेली : देशात महिलांवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. उत्तर प्रदेशात दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अॅसिड हल्ल्यामुळे महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातील बरेली येथे दोन अल्पवयीन मुलींवर जमावाने अॅसिड हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटत आहेत. दोन्ही मुलींची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. 



उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे सरकार आल्यानंतरही महिलांवर होणाऱ्या अत्याचारात काही घट झालेली दिसून येत नाही. दररोज हत्या, बलात्कार, लुटमारीच्या घटना घडत आहेत. आणि त्या रोखण्यास योगी आदित्यनाथ यांचे सरकार अपयशी ठरत आहे, अशी टीका आता होऊ लागली आहे. बरेलीत दोन अल्पवयीन मुलींवर अॅसिड हल्ला झाला. हा हल्ला जमावाने केला असल्याचे समोर येत आहे. 


पोलीस या घटनेची चौकशी करत असून त्यानंतरच या घटनेमागचे कारण व इतर माहिती स्पष्ट होईल.