मुंबई : ट्विटर अकाऊंटवर अभिनेता रजनीकांत यांनी आज राजकारणात येणार नसल्याची मोठी घोषणा केली आहे. यामुळे त्यांच्या राजकारणात प्रवेशाची आतुरतेने वाट पाहत असलेल्या चाहत्यांची निराशा झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून रूग्णालयात उपचार घेत असलेल्या अभिनेता रजनीकांतने आज राजकारणात येणार नसल्याची घोषणा केली. आपल्या आरोग्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. राजकारण न करता ते पूर्वीप्रमाणेच तामिळनाडूच्या जनतेसाठी काम करत राहतील, असेही ते म्हणाले. यासंदर्भात त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर माहिती दिली.


2021 मध्ये पार्टी सुरू करण्याविषयी त्यांनी घोषणा केली होती. अभिनेता रजनीकांत यांनी मंगळवारी राजकारणात प्रवेशास नकार दिला. राजकारणात येण्याचे जुने वचन मोडल्याबद्दल त्यांनी जनतेची दिलगिरी व्यक्त केली आणि ते म्हणाले, 'माझं सध्याचं आरोग्य म्हणजे देवाचा इशारा आहे.' आपल्या चाहत्यांची दिलगिरी व्यक्त करत ते म्हणाले की, 'आता मी पक्ष सुरू करण्याचा निर्णय मागे घेत आहेत.'



ते म्हणाले की, लोकांसाठी काम करत राहू. रजनीकांत यांना रक्तदाब समस्येमुळे 25 डिसेंबर रोजी हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या 10 दिवसांपासून हैदराबादमध्ये त्यांच्या चित्रपटाचे शूटिंग चालू आहे. सेटवरील काही लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.


 सोमवारी त्यांना डिस्चार्ज मिळाला. रुग्णालयाने जारी केलेल्या आरोग्यविषयक बुलेटिनमध्ये म्हटले आहे की , त्यांची प्रकृती आता पूर्वीच्या तुलनेत चांगली झाली आहे. त्यांना कोणतीही गंभीर समस्या नाही. तसेच, डॉक्टरांनी त्यांना बेड रेस्ट करण्याचा सल्ला दिला आहे.