5 जी टेक्नोलॉजीच्या विरुद्ध या अभिनेत्रीची कोर्टात याचिका, 2 जून रोजी सुनावणी
मुंबई हायकोर्टात यावर 2 जून रोजी सुनावणी होणार आहे.
मुंबई : 5 जी टेक्नोलॉजीच्या विरुद्ध अभिनेत्री जुही चावलाने याचिका दाखल केली आहे. मुंबई हायकोर्टात यावर 2 जून रोजी सुनावणी होणार आहे. जुही चावलाने मागील अनेक वर्षांपासून याच्या विरुद्ध आवाज उठवला आहे. 5G टेक्नोलॉजीची रेडियोफ्रिक्वेंसीमुळे लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होईल. त्यामुळे याला रोखले पाहिजे. सोमवारी होणारी सुनावणी टळली आहे.
जुही चावला अनेक दिवसांपासून 5जी टॉवरच्या विरोधात जनजागृती करत आहे. जुही चावलाच्या याचिकेला दुसऱ्या खंडपीठाकडे देण्यात आले आहे. जुहीची मागणी आहे की, या टेक्नोलॉजीला परवानगी देण्याआधी सर्व गोष्टी बारकाईने तपासून घेतल्या पाहिजे. ज्यामुळे याचा मनुष्य आणि इतर जीवांवर तसेच पर्यावरणावर कोणताही परिणाम होणार नाही.
5 जी टेक्नोलॉजी केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. जुहीने याचिकेमध्ये प्रश्न उपस्थित केला आहे की, या टेक्नोलॉजीवर योग्य ते संशोधन झालं आहे का? येणाऱ्या पीढीसाठी हे सुरक्षित आहे का?
यावर्षी 5G सेवा सुरु होऊ शकते. सरकारने देशात 5G ट्रायलसाठी 13 कंपन्यांना मंजुरी दिली आहे. सरकारने चीनी कंपन्यांना यापासून दूर ठेवले आहे. एका रिपोर्टनुसार, टेलीकॉम विभागाला 5जी ट्रायलसाठी 16 अर्ज मिळाले होते. त्यापैकी सरकारने 13 कंपन्यांना परवानगी दिली. सरकारने हुवावे आणि ZTE सारख्या चायनीज कंपन्यांना यापासून दूर ठेवलं आहे.
भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने देखील या ट्रायलसाठी सेंटर फॉर डेवलपमेंट ऑफ टेलीमेटिक्स (C-DoT)सोबत करार केला. C-DoT भारत सरकारचं टेलीकॉम टेक्नोलॉजी डेवलपमेंट सेंटर आहे. याची स्थापना 1984 मध्ये झाली. भारती एयरटेल, वोडाफोन-आयडिया आणि रिलायंस जिओने एरिक्सन आणि नोकियासोबत करार केला आहे.
भारतात 5G वर अजून ट्रायल होणं बाकी असतानाच अमेरिका, चीन आणि दक्षिण कोरियामध्ये 5 जी सेवा सुरु आहे. इतकंच नाही तर श्रीलंका, ओमान, फिलीपींस, न्यूझीलंड सारख्या 68 छो़ट्या देशांमध्ये ही 5 जी सेवा सुरु झाली आहे.