नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला वाय श्रेणी संरक्षण देण्यात येणार असल्याची माहिती पुढे येते आहे. सूत्रांच्या माहितीनुसार गृहमंत्रालय कंगनाला वाय श्रेणी संरक्षण देणार आहे.  कंगना रनौत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात शाब्दिक युद्ध तीव्र झाले होते. संजय राऊत यांनी कंगनाला मुंबईत न येण्याचा सल्ला दिला. यावर कंगनाने मुंबईत येण्याचे ठरवले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता केंद्रीय गृह मंत्रालय कंगना रनौतला वाय श्रेणी संरक्षण देणार आहे. कंगनाच्या संरक्षणासाठी 11 जवान तैनात असतील. त्यात एक-दोन कमांडो आणि उर्वरित पोलीस असतील. त्याची अधिसूचना थोड्या वेळात जारी केली जाऊ शकते. असे सांगितले जात आहे की 9 सप्टेंबर रोजी कंगना मुंबईला पोहोचेल तेव्हा तिला वाय श्रेणी संरक्षण दिलं जाईल.


याआधी हिमाचल प्रदेश सरकारने अभिनेत्री कंगना रनौतला सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. सीएम जयराम ठाकूर म्हणाले होते की, 'कंगना ही राज्याची कन्या आहे. त्यामुळे तिला सुरक्षा देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.'


सुशांतसिंह राजपूतच्या बाबतीत कंगना रनौत सुरवातीपासूनच अनेकांवर आरोप करत आहे. बॉलिवूड माफिया, नातलगवाद आणि आता ड्रग्ज या विषयावर ती उघडपणे बोलले आहे. कंगनाच्या या वक्तव्यांमुळे ती सेलिब्रिटींच्या निशाण्यावर आली, पण काही राजकीय पक्षांशीही तिचं शाब्दिक युद्ध सुरु झालं.


यासंदर्भात कंगना राणौत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु झाल्यानंतर इतर पक्षाचे नेते देखील आता यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. कंगनाने देखील संजय राऊत यांना खुलं आव्हान दिलं होतं.