Adani Enterprises Stock: अदानींच्या शेअर प्राईसमध्ये (Adani Share Price) गेल्या काही दिवसांपासून घसरण पाहायला मिळते आहे. त्यातून आता अदानींच्या अदानी एन्टप्राईजनंही (Adani Enterprises) घसरण गाठली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अदानी समूहांच्या शेअरमध्ये 7 टक्क्यांची (Adani Stocks Falls By 7%) घसरण झाली आहे. त्यातून आता गेल्या दिवसांपासूनच अदानींच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. या काही स्टॉक्समध्ये आपल्याला मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली असून सोबतच चार फर्म्संनी लोअर सक्रीट लिमिट (Lower Circuit Limit) ठेवले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांनी अदानी समूहामध्ये गुंतवणूक (Investors) केली असेल त्यांना मोठा फटका बसू शकतो. त्यातून कुठल्या शेअरमध्ये गुंतवणूक करायची अथवा काढायची याचीही माहिती करून घेणे आणि त्यानुसार स्टॉक्सवर लक्ष ठेवायला लागणार आहे. चला तर पाहूया की आता अदानींच्या शेअर्सची नक्की अवस्था तरी काय आहे? (adani enterprises stock falls this tuesday by 7 percent these lower ratings might affect the investors)


काय आहे अदानींच्या शेअर्सची अवस्था


बीएसईवरती (BSE) अदानी एन्टरप्राईजेज लिमिडेटचा (AEL) स्टॉक 7.16 टक्क्यांनी घसरला आहे. हा स्टॉक 1739.45 रूपयांवर (प्रति शेअर) वर येऊन थांबला आहे. त्यातून अदानी यांच्या अदानी ग्रीन एनर्जीतही (Adani Green Energy) 1.83 टक्क्यांची घसरण सुरू झाली आहे. हा शेअर काल 704.10 रूपयांवर येऊन थांबला आहे. अदानी पोर्ट्स एन्ड स्पेशल इकोनॉमिक झोनचा (Adani Ports and Special Economic Zones) शेअर हा 3.71 टक्क्यांनी खाली पडला असून तो 665.70 रूपयांवर बंद झाला आहे. अंबुजा सिमेंट्सचा (Ambuja Cement) शेअर हा 3.49 टक्क्यांनी घसरला आहे. त्याचबरोबर 355.00 रूपयांवर क्लोझ झाला आहे. 


पाहा आणखी कोणत्या कंपन्यांमध्ये घसरण?


अदानी विलमर (Adani Wilmar) या कंपनीच्या शेअरमध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. बीएसईवर हा स्टॉक 413.65 इतक्या रूपयांनी घसरला होता. त्यातून हा शेअर 4-5 टक्क्यांनी घसरला आहे. अदानी ट्रान्समिशनमध्येही (Adani Transmission) घट दिसून आली आहे हा शेअर काही दिवसांपुर्वीवर होता. तर यंदाही हा शेअर 5 टक्क्यांनी घसरला आहे. अदानी ट्रान्समिशन 901.55 रूपयांवर येऊन थांबला आहे. अदानी पावरमध्येही (Adani Power) घसरण आहे. हा शेअर 1.55 टक्क्यांनी घसरला आहे. अदानी पावर 706.10 रूपयांवर येऊन थांबला आहे. 


हेही वाचा - Priyanka Chopra बद्दल उलटसुलट बोलणारा प्रकाश जाजू कोण? नेमका काय होता 'तो' वाद


गुंतवणूकदारांनी कुठे लक्ष द्यावे? 


गौतम अदानींसाठी मागील महिना थोडा सुखकर होता. त्यांच्या याच शेअर्समध्ये काही प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळाली होती परंतु काही प्रमाणात शेअर मार्केटमध्ये (Market Cap) मोठी विपत्ती झाल्याचे पाहायला मिळाले आहे त्यातून येत्या काही दिवसांमध्ये अदानींचे शेअर पुन्हा गडगडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी आता अदानी समूहात कशी गुंतवणूक करावी यासाठी मोठ्या प्रमाणात अभ्यास करावा लागणार आहे.