मुंबई : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे.  एका धोकादायक व्हायरसने जगातील जनजीवन विस्कळीत केले आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव लक्षात घेत राज्य आणि केंद्र सरकारने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मदतीचे आवाहन केले होते. त्यामुळे कलाकार, खेळाडू त्याचप्रमाणे अनेक संस्थांनी कोरोनासह दोन हात करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी अदानी फाऊंडेशनकडून प्रधानमंत्री सहायता निधीला १०० कोटींची मदत मिळणार आहे, अशी घोषणा खुद्द उद्योगपती गौतम अदानी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ते म्हणाले, 'कोरोनासह मुकाबला करण्यासाठी अदानी फाऊंडेशनच्या वतीने प्रधानमंत्री सहायता निधीला १०० कोटी रूपयांची मदत करण्यात आली आहे.' त्याचप्रमाणे त्यांनी सरकारला  अतिरिक्त साहित्यांसाठी देखील मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संकटाला सामोरे जाण्यासाठी मदतीचे आवाहन केले आहे, तेव्हा पासून देशाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून मदतीचे हात पुढे येत आहेत. 



आता पर्यंत टाटा ट्रस्टने आजवरची सर्वात मोठी मदत जाहीर केली आहे. ट्रस्टने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी ५०० कोटी रुपये देऊ केले आहेत. यापूर्वी बजाज ग्रुपने १०० कोटी रुपयांची मदत करोनाशी लढण्यासाठी सरकारला देऊ केली होती. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी तसेच त्यांच्या मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांनी ५० लाख अशी एक कोटींची मदत जाहीर केली आहे. 


कोरोनाचा हा वाढता धोका लक्षात घेता बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार मदतीला धावला आहे. अक्षय कुमारने प्रधानमंत्री सहायता निधीला २५ कोटी रुपयांची मदत केली आहे.