२०१७मध्ये अडानींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे
२०१७ या वर्षामध्ये उद्योजक गौतम अडानींनी मुकेश अंबानींना मागे टाकलं आहे.
मुंबई : २०१७ या वर्षामध्ये उद्योजक गौतम अडानींनी मुकेश अंबानींना मागे टाकलं आहे. २०१७मध्ये अडानींची संपती तब्बल १२५ टक्क्यांनी वाढली आहे. तर मुकेश अंबानींची संपत्ती ८० टक्क्यांनी वाढली आहे. ब्लूमबर्गनं दिलेल्या बातमीनुसार भारतातले सगळ्यात मोठे पोर्ट ऑपरेटर आणि अडानी समुहाचे संस्थापक गौतम अडानींची संपत्ती मागच्या वर्षामध्ये १२४.६ टक्क्यांनी वाढली. जानेवारी २०१७मध्ये अडानींची संपत्ती ४.६३ अरब डॉलर होती तर डिसेंबरमध्ये हीच संपत्ती १०.४ अरब डॉलर(जवळपास ६६० अरब डॉलर) झाली.
अदानींनंतर यांचा नंबर
अडानींनंतर डी मार्टचे मालक राधाकृष्ण दमानी यांची संपत्ती सर्वाधिक वाढली आहे. २०१७मध्ये दमानींची संपत्ती ८० टक्क्यांनी वाढली आहे. मार्च २०१७मध्ये दमानींकडे ३.८८ अरब डॉलरची संपत्ती होती तर आता ६.९६ अरब डॉलर(जवळपास ४४१.३० अरब रुपये) एवढी संपत्ती आहे.
मुकेश अंबानी तिसऱ्या क्रमांकावर
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानींची संपत्ती २०१७मध्ये ७७.५३ टक्क्यांनी वाढली आहे. २२.७० अरब डॉलर असणारी अंबानींची संपत्ती वाढून ४०.३० अरब डॉलर(जवळपास २५३६ अरब रुपये) झाली आहे. जगभरातल्या सगळ्यात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये अंबानी २० व्या क्रमांकावर आहेत.
यांचीही संपत्ती वाढली
२०१७मध्ये कुमार बिर्लांची संपत्ती ५०.४१ टक्के, अजीम प्रेमजींची संपत्ती ४६.७२ टक्के, उदय कोटक यांची ४४.८७ टक्के, विक्रम लाल यांची ४४.०३ टक्के, लक्ष्मी मित्तल यांची संपत्ती ३६.११ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
जगभरातल पहिल्या क्रमांकावर कोण?
जागतिक स्तरावर जेफ बेजॉस यांची संपत्ती ५२ टक्क्यांनी वाढली आहे. ६५ अरब डॉलर असलेली बेजॉस यांची संपत्ती आता ९९ अरब डॉलर आहे. बेजॉस सगळ्यात मोठी ऑनलाईन रिटेल कंपनी अॅमेझॉनचे संस्थापक आहेत. बिल गेट्स आणि वॉरेन बफेट यांची संपत्ती अनुक्रमे १२ आणि १७ टक्क्यांनी वाढली आहे.