मुंबई : Adani Wilmar IPO: सध्या ग्राहकांमध्ये ब्रांडेड आणि पॅकेज फूडचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. अशातच फॉर्च्युन ब्रॅंडने एडिबल ऑइल बनवणारी FMCG कंपनी  Adani Wilmar चा आयपीओ (Initial Public Offering)27 जानेवारी रोजी खुला होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. Adani Wilmar ही गौतम अदानी ग्रुप आणि सिंगापूरच्या Wilmar ग्रुपची संयुक्त भागीदारी असलेली कंपनी आहे. (Upcoming IPO)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रुची सोया, एचयुएल, ब्रिटानिया, टाटा कंज्युमर प्रोडक्ट, डाबर इंडिया आणि नेस्ले इंडिया या सेक्टरची लिस्टेट कंपन्या आहेत. यांच्या स्पर्धेत आता Adani Wilmar सुद्धा उतरणार आहे. सध्या ग्राहकांमध्ये ब्रँडेड आणि पॅकेज फूडचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. कोरोना संसर्गाच्या दिवसांमध्ये पॅकेज फूडची मागणी वाढली आहे.


आयपीओची साइज


Adani Wilmar चे या आयपीओच्या माध्यमातून 4500 कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य होते. नंतर ते कमी करून 3600 कोटी करण्यात आले आहे. हा पूर्णतः फ्रेश इश्शू आहे. यामध्ये ऑफर फॉर सेल (OFS)नाही. कंपनी फक्त जनरल कॉर्पोरेटच्या कामकाजासाठी शेअर विकणार आहे.


2027 पर्यंत भारतातील या क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी बनन्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. अदानी ग्रुपची ही सातवी कंपनी आहे जी स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट होईल.