स्वदेशी वॅक्सीन Covaxinला पाण्याप्रमाणे म्हणणाऱ्या Adar Poonawalla यांचे स्पष्टीकरण
अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली : भारतात(India) कोरोना व्हायरस (Coronavirus) च्या दोन वॅक्सीनला आपत्कालीन परवानगी मिळाली आहे. यासोबत वादविवाद देखील समोर आले आहेत. स्वदेशी वॅक्सीन कोवॅक्सीनला (Covaxin) पाण्याप्रमाणे म्हणणाऱ्या सीरम इंस्टीट्यूटचे सीईओ अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांनी ट्वीट करुन आपले स्पष्टीकरण दिलंय.
मी दोन गोष्टी स्पष्ट करु इच्छितो. सार्वजनिक रुपात संभ्रमाची स्थिती आहे. सर्व देशांना वॅक्सीन निर्यातीची परवानगी आहे. भारत बायोटेक (Bharat Biotech) संदर्भात चुकीची माहिती पसरल्यास जॉईंट पब्लिक स्टेटमेंट दिले जाईल असे अदार पुनावाला (Adar Poonawalla) यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.
काय आहे पूर्ण प्रकरण ?
सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) चे सीईओ अदार पूनावाला (Adar Poonawalla)यांनी रविवारी एका मुलाखतीत म्हटले की, कोरोना विरोधात केवळ तीन वॅक्सिन प्रभावी आहेत. फायझर, मॉडर्ना आणि ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेको, बाकी सर्व 'पाण्याप्रमाणे सुरक्षित' आहेत.
भारत बायोटेकची नाराजी
अदार यांच्या विधानानंतर भारत बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक कृष्णा इल्ला यांनी नाराजी व्यक्त केलीय. स्वदेशी कोव्हॅक्सिन लसीला परवानगी दिल्यामुळे होणाऱ्या टीकेला भारत बायोटेकनं जोरदार प्रत्युत्तर दिलंय. लसीच्या 200 टक्के प्रामाणिक चाचण्या केल्या आहेत. भारत बायोटेकवरील टीका अनाठायी आहे. लस निर्मितीचा आमच्याकडे प्रचंड अनुभव आहे. 123 देशात भारत बायोटेक पोहोचलेली आहे. एवढा प्रदीर्घ अनुभव असलेली एकमेव कंपनी असल्याचं भारत बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक कृष्णा इल्ला यांनी उत्तर दिलंय.
मी चुकीचा असेल तर मला सांगा. काही कंपन्यांनी आमच्या वॅक्सिनला पाण्याप्रमाणे म्हटलंय. आम्ही वैज्ञानिक असून आमच्या परिक्षणावर कोणी प्रश्न उपस्थित करु नये असेही ते पुढे म्हणाले.