Sanitizer | सॅनिटायझर पिऊन नशा करण्याचा प्रयत्न, ३ भावांचा मृत्यू
लॉकडाऊनमध्ये दारू विकत घेऊ शकत नव्हते, म्हणून तिघांनी ही त्यांचे व्यसन पूर्ण करण्यासाठी रविवारी सॅनिटायझरचा 5 लीटर कॅन विकत घेतला.
भोपाळ: मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये दारूच्या व्यसनाधीन झालेल्या तीन भावांचा सॅनिटायझर पिऊन मृत्यू झाला आहे. भोपाळमध्ये सध्या लॉकडाऊनसुरु आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये दारू विकत घेऊ शकत नव्हते, म्हणून तिघांनी ही त्यांचे व्यसन पूर्ण करण्यासाठी रविवारी सॅनिटायझरचा 5 लीटर कॅन विकत घेतला. त्यामुळे त्यांचा मंगळवारी मृत्यू झाला आहे.
स्थानिक न्यूज पेपरमध्ये आलेल्या बातन्यांनुसार, मृत व्यक्ति परवत अहिरवार (Parvat Ahirwar) आणि भाऊ भूरा अहिरवार (Bhura Ahirwar) हे दोघेही कामगार होते, तर राम प्रसाद (Ram Prasad) हा पेन्टर होता. हे तिघेही विवाहित होते, परंतू ते आपल्या कुटूंबापासून दूरच रहात होते.
या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, रविवारी या तिघांनी 5 लिटर सॅनिटायझरचा कॅन विकत घेतला आणि त्यातील निम्म्या सॅनिटायझरचे सेवन केले. त्यानंतर सॅनिटायझर प्यायल्यानंतर लवकरच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. दुसऱ्या दिवशी खराब परिस्थिती असतानाही दारुच्या हव्यासापोटी त्यांनी सोमवारी पुन्हा सॅनिटायझरचे सेवन केले.
सोमवारी रात्री घरी उशीरा राम प्रसाद आपल्या घरी जहांगीराबाद येथे गेला असल्याने त्याचा मृतदेह उशीरा मिळाला. दरम्यान, मंगळवारी सकाळी इतर दोन जण एमपी नगरमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले. स्थानिकांनी त्यांची वाईट अवस्था पाहूण पोलिसांना याबद्दल रिपोर्ट दिला. पोलिसांनी तातडीने जेपी रुग्णालयात त्यांना दाखल केले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी याबाबत तक्रार नोंदवून पुढील तपास सुरु आहे.
ही भारतातील अशी पहिली घटना नाही, कारण गेल्या वर्षभरात देशभरातून अशा प्रकारच्या अनेक मृत्यूची नोंद झाली आहे. आंध्र प्रदेशातील अशाच एका घटनेत, विजयवाडामध्ये मागील दोन दिवसात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सॅनिटायझर प्यायल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे.