भारतीय जवानांचा ट्विटरवर कवितेच्या माध्यमातून वीर संदेश
आपल्या सीमेची सुरक्षा आणि सेनेच्या वीरतेवर ही कविता भाष्य करते.
नवी दिल्ली : भारताने दहशतवाद्यांविरोधात पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकची चर्चा देशभरात होत आहे. भारतीय वायुसेनेने केलेल्या कारवाईचे कौतुक चहूबाजुने होत आहे. भारताने पाकिस्तानात केलेल्या एअर स्ट्राईकनंतर त्यावर पाकिस्तानकडून हरकती सुरु झाल्या आहेत. भारताच्या हवाईदलाने मंगळवारी पहाटे पाकिस्तानाच घुसून दहशतवाद्यांची ठिकाणं उध्वस्त केली होती. ज्यामध्ये जैश-ए-मोहम्मदचे अनेक महत्त्वाच्या दहशतवाद्यांसह जवळपास ३०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. दोन्ही देशात युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जवानांनी आपल्या देशाला कवितेच्या माध्यमातून एक वीर संदेश दिला आहे. भारतीय सेनेच्या ट्वीटर हॅंडलवरून एक कविता पोस्ट करण्यात आली आहे. आपल्या जवानांचे शौर्य, आपल्या सीमेची सुरक्षा आणि सेनेच्या वीरतेवर ही कविता भाष्य करते.
काय आहे कविता ?
'माथे तिलक लगाती हमको, वीर प्रसूता मातायें; वीर शिवा, राणा, सुभाष की, भरी पड़ी हैं गाथायें। सरहद है महफूज हमारी, अपने वीर जवानों से; लिखते है इतिहास नया नित, जो अपने बलिदानों से।।' भारतभूमी ही वीरांची भूमी आहे. या भूमीनेच वीरतेचा वारसा आम्हाला दिला आहे. वीर शिवा, राणा, सुभाष यांचा इतिहास आम्हाला प्रेरणा देतो. आमच्या सीमा या वीर जवानांमुळे नेहमीच सुरक्षित आहेत. आम्ही आमच्या बलिदानाने रोज नवा इतिहास लिहितो असा संदेश या कवितेतून जगाला देण्यात आला आहे.
भारतीय जवानांनी दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईनंतरही एक कविता पोस्ट करण्यात आली होती. 'आज सिन्धु ने विष उगला है; लहरों का यौवन मचला है। आज ह्रदय में और सिन्धु में, साथ उठा है ज्वार; तूफानों की ओर घुमा दो, नाविक निज पतवार।'
आज सिंधुने विष उगळलेय, वाऱ्यानेही थैमान घातले आहे. हृदय आणि सिंधु दोन्हीकडे ज्वार उठलेय, आलेल्या तुफानाला परतवून लावूया जशास तसे उत्तर देऊया अशा आशयाचा संदेश यातून देण्यात आला आहे.
26 फेब्रुवारीला 3.30 वाजता भारतीय वायु सेनेने एलओसीवर जाऊन पाकच्या बालाकोट येथील दहशतवादी चौक्यांवर कारवाई केली. 12 मिराज-2000 फायटर जेटने ही कारवाई केली. यांनी पाकिस्तानातील दहशतवादी असलेल्या ठिकाणांवर 1000 किलोचा बॉम्ब वर्षाव केला आहे. या हल्ल्यामध्ये 200 ते 300 दहशतवादी मारले गेल्याचे सांगण्यात येत आहे.