ADIDAS Brother AJITDAS Anand Mahindra Tweet: जगभरात अनेक ब्रँड प्रसिद्ध असून त्यांच्या गुणवत्तेसाठी ओळखले जातात. स्मार्टफोन, कपडे आणि बुटापर्यंत अनेक ब्रँड प्रसिद्ध आहे. चांगल्या गुणवत्तेमुळे हे ब्रँड महाग असतात. जास्त पैसे मोजावे लागत असले तरी अनेकांना ब्रँडबद्दल आकर्षण असतं. कारण या ब्रँडमुळे स्टेटस अधोरेखित होत असतं. त्यामुळे काही जण नुसत्या सिम्बॉलला भुलून जातात आणि बनावट प्रोडक्ट घरी आणतात. काही कंपन्या प्रसिद्ध ब्रँडची अशी हुबेहुब बनावट करतात की सहज ओळखणं कठीण होऊन जातं. अशाच एका ब्रँडचा फोटो उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत अॅडिडास (Adidas) ब्रँड बुटं दिसत आहेत. पोस्ट केलेल्या फोटोत पांढऱ्या रंगाचे स्पोर्ट्स शूज दिसत आहेत. दोन्ही बुटांवरील ब्रँड सिम्बॉल एक सारखाच आहे. मात्र नावात साधर्म्य नसल्याने चोरी पकडली गेली आहे. 


आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करत फिरकी घेतली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या फोटोत तुम्ही पाहू शकता की, दोन शूज आहेत. बुटांवरील सिम्बॉल तर एकसारखाच दिसतो त्यामुळे अॅडिडास ब्रँड असल्याचं दिसत आहे. मात्र एका बुटावर 'ADIDAS', तर एका बुटावर 'AJITDAS' असं लिहिलेलं आहे. आनंद महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "याचा साधा सोपा अर्थ असा आहे की आदिचा एक भाऊ आहे आणि त्याचं नाव अजीत आहे. वसुधैव कुटुंबकम?" या पोस्टखाली युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एका युजर्सने एका टी-शर्टचा फोटो टाकून अॅडिडासच्या जागेवर कालिदास लिहिल्याचं दाखवलं आहे. 



बातमी वाचा- रेल्वेद्वारे Ramayana Yatra करण्याची संधी, Free मध्ये मिळणार 'या' सुविधा; जाणून घ्या शेड्यूल


पोस्टखाली लोकांच्या मजेशीर प्रतिक्रिया


पोस्टखाली युसर्जनी मजेशीर प्रतिक्रिया देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, "आदिचा अर्थ पहिला आणि अजितचा अर्थ अजेय. संबंधित असल्यासारखं वाटतं. अॅडिडास आणि अजीतदास काकभाऊ असतील." दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे का, "मला माझ्या कॉलेज जीवनातील आठवण आली. आदि आणि दास या दोघांनी या ब्रँडची सुरुवात केली." तिसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, "अॅडिडासचा भाऊ कुंभमेळ्यात हरवला होता. आता कुठे जाऊन बुटाच्या ब्रँडमध्ये मिळाला."