ADITYA-L1 प्रक्षेपणाचं काऊंटडाऊन सुरु; एका चुकीमुळं इस्रोला मोठा हादरा बसण्याची भीती
Aditya L1: बापरे... कठीणच ते! इस्रोची आणखी एक मोहिम आता अवघ्या काही तासांनी अवकाशाच्या दिशेनं झेपावणार असून, त्याआधीच समोर आली ही महत्त्वाची माहिती. जाणून घ्या...
Aditya L1 Launch : चांद्रयान 3 (Chandrayaan 3) मोहिमेला यश मिळत असतानाच आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोकडून (ISRO) आणखी एका मोहिमेच्या तयारीला वेग आला आहे. ही मोहिम म्हणजे, इस्रोची सूर्य मोहिम आदित्य एल1. इस्रोकडून सदरील मोहिमेसाठीची रंगीत तालीम पूर्ण झाली असून आता फक्त प्रक्षेपणाचं Countdown सुद्धा सुरु झालं आहे. त्यामुळं भारतीयांच्या मनातही धाकधूक वाढली आहे.
सूर्य मोहिमेसाठी रॉकेट आणि सॅटेलाईट तयार आहेत. शनिवारी म्हणजेच 2 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथे असणाऱ्या अंतराळ केंद्रातून आदित्य एल1 लॉन्च करण्यात येईल. आश्चर्याची बाब म्हणजे या मोहिमेच्या माध्यमातून इस्रो एक वेधशाळा अंतराळात पाठवत असून, ती सूर्य आणि तेथील परिस्थितीचा अभ्यास करत महत्त्लाचा तपशील पृथ्वीपर्यंत पाठवत राहील.
मोहिमेतील आव्हानं...
इस्रोची ही मोहिम सोपी वाटत असती आणि चांद्रयानाच्या यशामुळं अनेक गोष्टी जमेच्या पारड्यात असल्या तरीही काही बाबतीत असणारा धोका इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनीही नाकारलेला नाही. या मोहिमेदरम्यान असणारा सर्वात मोठा धोका म्हणजे यानाचा वेग. जर, आदित्य एल1 च्या वेगावर नियंत्रण ठेवता आलं नाही, तर हे यान सूर्याच्या दिशेनं जाताना वाटेतच नष्ट होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळं यानाचा वेग कमी करता आल्यासच ही मोहिम यशस्वी ठरेल.
गुरुत्त्वाकर्षण नियमानुसार पृथ्वी तिच्या कक्षेभोवती असणाऱ्या गोष्टी स्वत:कडे खेचते. त्यामुळं यानाला पृथ्वीच्या कक्षेतून पाहेर नेणं हे मोठं आव्हानाचां काम असणार आहे. यासाठी आदित्य एल1 ला क्रूझ फेज आणि हॅलो कक्षेमध्येच एल1 स्थितीत यावं लागेत. इथं वेग नियंत्रणात आणण्याचा टप्पा असेल. हा वेग वेळीच नियंत्रित झाला नाही तर यान सूर्याच्याच दिशेनं पुढे जाईल आणि यादरम्यानच ते पेट घेऊन नष्ट होईल. त्यामुळं या टप्प्यावर संशोधकांसह संपूर्ण अंतराळ क्षेत्राचं लक्ष असणार आहे.
हेसुद्धा वाचा : Asia Cup : IND vs PAK सामन्यात भारताला आफ्रिदीमुळं मिळणार सहज विजय?
सूर्य मोहिमेविषयी आणखी थोडं...
आदित्य एल1 च्या निमित्तानं भारत पहिल्यांदाच सूर्यमोहिमेत सहभाग घेताना दिसत आहे. पृथ्वीपासून साधारण 15 लाख किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ठिकाणावरून हे यान परीक्षण करताना दिसणार आहे. इथं अर्थात सूर्य-पृथ्वी लँग्रेजियन बिंदुपर्यंत पोहोचण्यासाठी यानाला चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. सोप्या भाषेत सांगावं तर हा एक असा बिंदू आहे जिथं सूर्य आणि पृथ्वीच्या गुरुत्त्वाकर्षणाचं बळ एकसमान असतं.