Aditya-L1 Mission: इस्रोच्या आदित्य एल-1 सूर्यमोहिमेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. भारताच्या आदित्य L-1 सूर्ययानानं आपला महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. आदित्य L1 ने आतापर्यंत 9.2 लाख किमी अंतर कापले आहे.  आदित्य L-1 ला पृथ्वीच्या प्रभावक्षेत्राच्या बाहेर अंतराळयान पाठवण्यात इस्रोला सलग दुसऱ्यांदा यश आले आहे. आता फक्त आणखी 101 दिवस प्रवास केल्यानंतर  आदित्य एल-1 मोठा टप्पा पार करणार आहे. 2 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी भारतीय वेळेनुसार 11 वाजून 50 मिनिटांनी श्रीहरीकोटा येथून आदित्य L-1 यान सूर्याच्या दिशेने झेपावले आहे. 


आदित्य L1 चा लॅग्रेंज पॉइंटच्या दिशेने प्रवास सुरु


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इस्रोने ट्विट करत आदित्य L1 मोहिमेबाबत अपडेट दिली आहे. आदित्य L1 ने आतापर्यंत 9.2 लाख किमी अंतर कापले आहे. पृथ्वीचा प्रभाव क्षेत्र यशस्वीपणे टाळून हे अंतर पार केले आहे. आदित्य L1 चा आता L1 पॉईंट अर्थात लॅग्रेंज पॉइंटच्या Trans Lagrangian Point 1 Insertion (TLI1)  दिशेने प्रवास सुरु झाला आहे. 


आदित्य एल-1 ने पाठवला डेटा


आदित्य एल-1' कडून वैज्ञानिक डेटा गोळा करण्यास सुरुवात केली आहे. याने एक फोटो देखील पाठवला होता. STEPS उपकरणाने हा डेटा गोळा केलाय.  या उपकरणाने 50 हजार किलोमीटर अंतरावरून सुपरथर्मल-एनर्जेटिक आर्यन आणि इलेक्ट्रॉन्सचा अभ्यास सुरू केला आहे. त्यामुळे या कणांचा पृथ्वीवर काय परिणाम होतो हे समजण्यास वैज्ञानिकांना मदत होणार आहे. 


15 लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी सूर्ययानाला वेगाची गरज


15 लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी सूर्ययानाला वेगाची आवश्यकता आहे. त्याचदृष्टीनं पृथ्वीच्या कक्षेत सूर्ययानाच्या प्रदक्षिणा सुरु आहेत. 15 लाख किलोमीटरचं अंतर पार केल्यावर आदित्य यान जेव्हा सूर्यकक्षेत प्रवेश करेल तेव्हा त्यातील सारे पेलोड्स ऑन केले जातील. थोडक्यातील त्यातील सारी यंत्र सक्रिय केली जातील आणि सूर्ययान सूर्याचा अभ्यास करेल. मॉरिशस, बंगळुरु आणि पोर्ट ब्लेअर केंद्रांवरुन आदित्यच्या मार्गक्रमणावर लक्ष ठेवलं जातंय. 


आणखी 101 दिवसांचा प्रवास


आदित्यला केवळ 110 दिवस अंतराळात प्रवास करायचा आहे. आदित्य L1 वरून सूर्याचा पहिला फोटो फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये उपलब्ध होवू शकतो. VELC ची निर्मिती भारतीय खगोल भौतिकी संस्थेने केली आहे.  VELC पेलोडच्या मदतीने सूर्याचे एचडी फोटो घेता येणार आहेत. L1 पॉईंटवर पोहचल्यावर आदित्यचे सर्व पेलोड्स चालू होतील. सर्व उपकरणे सक्रिय होतील. यानंतर खऱ्या अर्थाने आदित्य L1 सूर्याचा अभ्यास सुरू करेल. 


L1 पॉईंट म्हणजे नेमकं काय?


L1 पॉइंटजवळ एका ठराविक बिंदूवर सूर्य आणि पृथ्वी दोन्ही ग्रहगोलांची बलं समसमान होतात. येथे असलेली वस्तू कुणा एकाच्या बाजूनं खेचली न जाता मध्ये बॅलन्स राहते तेथे हे यान पोहचणार आहे.  L1 पॉइंटजवळ सूर्याकडून येणारी तीव्र किरणं किंवा रेडिएशनचा आदित्य L-1 यानवर परिणाम होवू शकतो.  L-1 कक्षेत सूर्य आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत हे यान पोहचवणे सर्वात मोठे आव्हान असणार आहे.  सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये असलेल्या  L-1 पॉइंटजवळ हे यान पोहचणार आहे.  आदित्य L-1 यान दीड लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण करुन सूर्याच्या एका ठराविक कक्षेत जाणार आहे.  सूर्य हा पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर आहे.   पृथ्वी आणि चंद्रादरम्यानच्या अंतरापेक्षा जळपास चौपट अंतर पार करुन हे यान सूर्याच्या जवळ जाणार आहे. 


पुढील पाच वर्ष आदित्य L-1 सूर्याचा अभ्यास करणार


ISRO च्या या मोहिमेमुळे आता भारताला सूर्याचा अभ्यास करणं सहज शक्य होणार आहे. हे यान पृथ्वीच्या कक्षेतच फिरणार आहे. संपूर्ण प्रक्रियेस जवळपास चार महिन्यांचा कालावधी लागेल.या मोहिमेमुळे पुढील पाच वर्षांसाठी हे यान सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोला मदत करणार आहे.