व्यभिचाराच्या निर्णयाविषयी व्हायरल होणारे हे मीम्स पाहिले का?
अनेकांनीच याविषयी विविध पद्धतींनी व्यक्त होण्यास सुरुवात केली.
मुंबई: गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने अतिशय महत्त्वाचा निर्णय देत एक ऐतिहासिक सुनावणी केल्याचं पाहायाला मिळालं. व्यभिचार हा फौजदारी गुन्हा नसल्याचा निर्णयय सर्वोच्च न्यायालयाने दिला. महिला आणि पुरूष कायद्याच्या दृष्टीने समान असून दंडविधानाचे कलम ४९८ हे घटनाबाह्य असल्याचंही न्यायालयाने स्पष्ट केलं. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यासह पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठानं हा निकाल दिला.
अतिशय महत्त्वाच्या अशा या निर्णयासोबतच पती हा पत्नीचा मालक नाही, महिलांचा सन्मान हा राखला गेलाच पाहिजे हा मुद्द्ही अधोरेखित करण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर अनेकांनीच त्याचं स्वागत केलं.
काही नेटकऱ्यांनी या निर्णयाविषयी ट्विट करत आणि विनोदी मीम्स पोस्ट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं.
कोणी चित्रपटातील संवादांचा वापर करत या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली तर कोणी, आपली विनोदबुद्धी वापरत या प्रकरणावर विनोदी अंगाने भाष्य केल्याचं पाहायला मिळालं.