Shradha Walkar Case : क्रूरकर्मा आफताबला दिलासा नाहीच! कोठडीत 14 दिवसांची वाढ
श्रद्धा वालकार हत्या प्रकारणातील आरोपी आफताबच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ... पोलिसांच्या मागणीनंतर न्यायालयाचा मोठा निर्णय
Shraddha Walkar Murder Case: श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) प्रकरणातील आरोपी आफताब पुनावालाच्या (Aftab Amin Poonawala) न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. व्हर्च्युअल कॉन्फरन्सिंगद्वारे आफताबला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयात मेहरौली पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी देखील उपस्थित होते. पोलिसांनी न्यायालयात सांगितलं की, 'श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी तपास सुरु असल्यामुळे आफताबच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात यावी...'
पोलिसांच्या मागणीनंतर न्यायालयाने आफताबच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे. याआधी आफताब 13 दिवसांसाठी तिहार तुरुंगात होता. तिहार तुरुंगातून त्याला पोलिग्रॉफ आणि नार्को टेस्टसाठी पाठवण्यात आलं. या प्रकरणी दिल्ली पोलीस (delhi police) डीएनए आणि FSL रिपोर्टसोबतच सर्व रिपोर्टच्या प्रतीक्षेत आहे.
श्रद्धाची हत्या केल्यानंतर काय म्हणाला आफताब
श्रद्धाची हत्या (shraddha walker story) करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचा मला कोणताही पश्चाताप नाही... 'आफताह म्हणाला श्रद्धाच्या हत्या प्रकरणात फाशी झाली तरी हरकत नाही. स्वर्गात गेल्यानंतर मला आणखी अप्सरा भेटतील.' असं देखील आफताब चौकशी दरम्यान म्हणाला.
दिल्ली पोलिसांनी (delhi police) आफताबला अटक केली असली तरी आफताब दररोज नवनवीन खुलासे करत आहे. आता तर आफताबने पोलिसांकडे खुनाची कबुली देताना म्हणाला की, “होय, मी श्रद्धा वालकरचा खून केला आहे. तिच्या मृतदेहाचे तुकडे आणि खून करण्यासाठी वापरलेलं हत्यार शोधून दाखवा, असं आव्हान तुम्हाला देतो.” (Shraddha Walkar Murder Case )
आफताबने दिल्ली पोलीस आणि तपास यंत्रणांना हत्येसाठी वापरण्यात आलेलं हत्यार आणि श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधण्याचे आव्हान दिलं आहे. आफताच्या या गुन्ह्यानंतर संपूर्ण देशात वातावरण तापलं आहे. आफताबला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे आफताबला त्याने केलेल्या गुन्ह्याची कोणतीही खंत नाही. तुरुंगात (Tihar Jail) देखील तो टेन्शन फ्री आयुष्य जगत आहे.