मुंबई : फ्रान्स आणि अमेरिका या दोन्ही राष्ट्रांसह भारताकडून द्विपक्षीय करार करण्यात आले आहेत. ज्याअंतर्गत शुक्रवापासून आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाच्या निमित्तानं विमानानंची उड्डाणं सुरु होत आहेत. सिव्हील एविएशन खात्याचे केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार जर्मनी आणि ब्रिटन यांच्यासहसुद्धा अशा प्रकारचे द्विपक्षीय करार प्रस्तावित आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेच्या युनायटेड एअरलाईन्सच्या वतीनं भारत आणि अमेरिकेदरम्यान, १७ जुलै ते ३१ जुलै या काळात एकूण १८ उड्डानं आकाशात झेपावणार आहेत. तर, १८ जुलै ते ते १ ऑगस्ट या काळात फ्रान्सकडून दिल्ली, मुंबई, बंगळुरूच्या दिशेनं येणाऱ्या २८ उड्डाणांची सुरुवात केली जाणार आहे. युकेसोबत अशा प्रकारचा करार शक्य  तितक्या लवकर करत दर दर दिवशी लंडन आणि दिल्ली दरम्यान, दोन उड्डाणांच्या सुविधेचा प्रस्ताव असल्याचं ते म्हणाले. 


पुरी यांच्या माहितीनुसार इतरही देशांकडून 'एअर बबल'साठीची विचारणा होत आहे. असं असलं तरीही आपल्याला या घडी हाताळता येतील तितक्याच प्रवाशांना अनुमती देण्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. दरम्यान, या सुविधेअंतर्गत भारताकडून एअर इंडिया फ्रान्स आणि अमेरिकेपर्यंतची विमान सेवा पुरवेल. 


 


coronavirus कोरोना व्हायरसचा देशातील प्रादुर्भाव पाहता २३ मार्चपासून ठरलेल्या वेळापत्रकानुरसार असणारी विमानं आणि इतरही विमानसेवा थांबवण्यात आल्या. जवळपास दोन महिन्यांच्या पूर्ण बंदीनंतर २५ मे रोजी सशर्त देशांतर्गत विमानसेवा सुरु करण्यात आली होती.