भ्याड हल्ल्यानंतर भारताच्या वतीनं चोख प्रत्तुत्तर देण्याचा निर्णय
दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारताच्या वतीनं त्यांना चोख प्रत्तुत्तर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हल्ल्याचा निषेध नोंदवताना यात्रा सुरूच ठेवण्यात येणार आहे. आज सकाळी वेळापत्रकानुसार यात्रेकरूची गट कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथच्या दिशेनं रवाना झाले. जम्मू बालताल मार्गावर हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आलीय. त्याचप्रमाणे देशात सर्वत्र हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारताच्या वतीनं त्यांना चोख प्रत्तुत्तर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हल्ल्याचा निषेध नोंदवताना यात्रा सुरूच ठेवण्यात येणार आहे. आज सकाळी वेळापत्रकानुसार यात्रेकरूची गट कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथच्या दिशेनं रवाना झाले. जम्मू बालताल मार्गावर हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आलीय. त्याचप्रमाणे देशात सर्वत्र हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भ्याड हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निषेध केला आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांप्रति संवेदना व्यक्त करताना पंतप्रधानांनी अशा भ्याड हल्ल्यांमुळे भारत झुकणार नसल्याचं म्हटलं आहे.
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी हा भ्याड हल्ला असल्याचं म्हटलं आहे. यात्रेकरुंवरील हल्ला हा दुःखद असून हे सुरक्षा दलांपुढील आव्हान देखील असल्याचे अहिर यांनी यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान अमरनाथ झालेल्या हल्ल्याचं तीव्र दुःख आहे. दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी सरकारनं पावंल उचलली आहेत त्यात लवकरच यश येईल असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा गो वैद्य यांनी व्यक्त केलं आहे.