AMUL आणि मदर डेअरीनंतर या ब्रँडचे दूधही महागले, आजपासून दरात वाढ
Milk Price Hike: दोन दिवसांपूर्वी अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली होती. यानंतर इतर कंपन्यांचे दुग्धजन्य पदार्थही महाग होतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. ही शक्यता आता खरी होताना दिसत आहे.
मुंबई : Milk Price Hike: दोन दिवसांपूर्वी अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली होती. यानंतर इतर कंपन्यांचे दुग्धजन्य पदार्थही महाग होतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. ही शक्यता आता खरी होताना दिसत आहे. आता पंजाब स्टेट कोऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्युसर्स फेडरेशन लिमिटेडने (मिल्कफेड पंजाब) दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, त्याआधी गोकुळच्या म्हशीच्या दुधाचा प्रतिलिटरचा विक्री दर 1 ऑगस्टपासून 2 रुपयांनी वाढले आहेत. यामुळे प्रतिलिटरचा दर 66 रुपये झाला आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दुधाच्या दरात वाढ करावी लागल्याने डेअरीने विक्री दरात वाढ केली आहे. आता अमूलने दूध दरात पुन्हा वाढ केल्याने दूध दर आणि दुग्धजन्य पदार्थांच्या दरात वाढ झाली आहे. मिल्कफेड वेरका या ब्रँड नावाने दुग्धजन्य पदार्थ विकते. अमूल आणि मदर डेअरीच्या दरात वाढ केल्यानंतर मिल्कफेडने हे पाऊल उचलले आहे.
अमूलने 17 ऑगस्टपासून दूध महाग
अमूलचे 17 ऑगस्टपासून दूध महाग झाले आहे. मिल्कफेडने जारी केलेल्या निवेदनात एका अधिकाऱ्याने सांगितले की, "19 ऑगस्टपासून दुधाचे दर प्रति लिटर 2 रुपयांनी वाढतील." यापूर्वी अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ केली आहे. 17 ऑगस्टपासून दूध नवीन दराने उपलब्ध होणार आहे. अमूल गोल्डचा भाव आता 61 रुपये प्रति लिटर झाला आहे, जो पूर्वी 59 रुपये प्रति लिटर होता.
कंपन्यांकडून गेल्या सहा महिन्यांत दुसऱ्यांदा दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे .याआधी मार्चमध्ये कंपन्यांनी दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ केली होती. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (जीसीएमएमएफ), जे अमूल ब्रँड अंतर्गत दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थ विकतात, म्हणाले की अहमदाबाद आणि सौराष्ट्र, दिल्ली-एनसीआर, पश्चिम बंगाल, मुंबईमध्ये दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ झाली आहे. आणि गुजरातच्या इतर बाजारपेठांनी करण्याचा निर्णय घेतला आहे. 2 रुपये प्रति लिटर दरवाढीमुळे एमआरपीमध्ये (कमाल किरकोळ किंमत) चार टक्क्यांनी वाढ झाली आहे, जी सरासरी धान्य महागाईपेक्षा कमी आहे.