Who is Noel Tata: देशातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. रतन टाटा हे शिपायांपासून अधिकारीपर्यंत प्रत्येकाला सन्मानाची वागणूक देणारे, दानशूर आणि दयाळू उद्योकपती होते. त्यांनी जगभरात भारताचे नाव मोठे केले. पण आता रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा समूहाचा कारभार कोण पाहणार हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. यातच नोएल टाटा यांचे नाव समोर येत आहे. पण रतन टाटांनंतर टाटा समूह सांभाळणारे नोएल टाटा नक्की आहेत तरी कोण?


कोण आहेत नोएल टाटा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


रतन टाटांनंतर नोएल टाटा टाटा समूह सांभाळणार असल्याची चर्चा आहे. नोएल टाटा हे रतन टाटा यांचे भाऊ आहेत. रतन टाटांचे वडील नवल टाटा यांनी दोन लग्न केले होते. नवल टाटा यांची पहिली पत्नी सूनी टाटा यांना रतन टाटा आणि जिमी टाटा अशी दोन मुले झाली. सूनी टाटांशी घटस्फोट घेतल्यानंतर नवल टाटा यांनी 1955 मध्ये दुसरे लग्न केले. त्यांची दुसरी पत्नी सिमोन या स्वित्झर्लंडच्या एक महिला उद्योगपती होत्या. नोएल टाटा हे नवल टाटा आणि सिमोन टाटा यांचा मुलगा आहेत.


टाट ट्रस्टमध्ये नोएल यांचा वाढता सहभाग


 


नोएल टाटा हे 63 वर्षांचे असून ते ट्रेंटचे अध्यक्ष आहेत. गेल्या काही वर्षांत नोएल यांनी टाटा ट्रस्टमध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहेत. टाटा समूहातील नोएल यांची कारकीर्द साधारणतः 2000 साली  सुरू झाली. 2010-2011 पर्यंत त्यांची टाटा इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आली. त्यानंतर त्यांचे मेहुणे सायरस मिस्त्री यांना रतन टाटा यांचे उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्यात आले होते. पण ऑक्टोबर 2016 मध्ये त्यांचे मेहुणे सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून काढून टाकण्यात आले. या काळात टाटा समूहातील नोएल टाटांची भूमिका सतत विस्तारत गेली. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार नोएल टाटा सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्टचे विश्वस्त आहेत. या टाटा ट्रस्टच्या सर्वात प्रभावशाली संस्था असून टाटा सन्समधील 66 टक्क्यांहून अधिक शेअर्स नियंत्रित करतात.नोएल टाटा हे टाटा इंटरनॅशनल लिमिटेड, व्होल्टास लिमिटेड, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या टाटा समूहाच्या कंपन्यांचे अध्यक्ष आणि टायटन कंपनीचे उपाध्यक्षही आहेत.


 
नोएल टाटा आणि टाटा समूहाचे वैयक्तिक संबंध


 


टाटा सन्समधील सर्वात मोठे वैयक्तिक शेअरहोल्डर असलेले पालोनजी मिस्त्री यांची मुलगी आलू मिस्त्री या नोएल टाटा यांच्या पत्नी आहेत. याशिवाय नोएल यांची मुले लेआ, माया आणि नेव्हिल यांनाही टाटा ट्रस्टशी संलग्न 5 प्रमुख ट्रस्टचे विश्वस्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. 


टाटा ट्रस्टमधील नोएल त्यांचा वाढता सहभागामुळे भविष्यात ते टाटा ट्रस्टचे नेतृत्व करतील असा अंदाज वरवण्यात येतो आहे.