मुंबई :  ‘हेलिकॉप्टर भेळ' नाव ऐकून तुम्ही देखील अवाक् तर नक्की झाले असाल. भेळ म्हणजे कमी पैशांत पोट भरून खायला मिळणारा पदार्थ. आता सोशल मीडियावर  ‘हेलिकॉप्टर भेळ'  (Helicopter Bhel)व्हायरल होत आहे. सध्या असे अनेक खवय्ये (Food bloggers) आहेत, जे वेग-वेगळ्या ठिकाणा जातात आणि चविष्ठ पदार्थांचा आस्वाद घेतात. काही दिवसांपूर्वी Flying Dosa ने अनेकांच्या तोंडावर तोंडाला पाणी सुटंल. पण आता त्याची जागा  ‘हेलिकॉप्टर भेळ'ने घेतली आहे. (after Flying Dosa  Helicopter Bhel viral on social media)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या ‘हेलिकॉप्टर भेळ' सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती भेळ (street food) बनवताना दिसत आहे. त्याचा भेळ बनवण्याचा अंदाज पाहून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. कारण आपण नेहमी जी भेळ खातो, त्या पेक्षा ही भेळ फार वेगळी असल्याचं दिसत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


व्हिडीओमध्ये हटके स्टाईलने भेळ बनवणारा हा व्यक्ती सध्या तुफान चर्चेत आहे. भेळ गरगर फिरवून काही सेकंदात सर्व्ह करताना दिसत आहे.  त्यांच्या या वेगळ्या स्टाईल या भेळीला ‘हेलिकॉप्टर भेळ’ असं नाव मिळालं आहे. 


'हेलिकॉप्टर भेळ' हा व्हिडीओ @Trollgramofficial युजरने Instagram वर शेअर केला आहे. व्हिडीओला आतापर्यंत 94.2k व्ह्यूज आणि 3.3k पेक्षा जास्त लाईक्स  मिळाले आहेत. या व्हिडीओवर खाद्या प्रेमिंकडून ( foodies) प्रतिक्रिया येत आहेत.