शाळेत रुबाब, पण घरी दबाव... हे कारण ऐकल्यावर तुम्हालाही येईल हेडमास्तरांची दया
शाळेत मुख्याध्यापक असणाऱ्या पतिराजांनी आपल्या पत्नीविरोधात न्यायालयात धाव घेतलीय त्याचं कारण ऐकून त्या हेडमास्तरांची तुम्हाला दया येईल.
राजस्थान : शाळेचे हेडमास्तर म्हटलं की भल्याभल्याना घाम फुटतो. पण, शाळेचे हेडमास्तर यांनाच घरी जाताना घाम फुटत असेल तर? हो अशीच एक घटना राजस्थानच्या भिवंडी भागात घडलीय.
पत्नीकडून छळ होत असल्याची तक्रार करत मुख्याधापक अजित सिंह यांनी भिवडी न्यायालयात धाव घेतलीय. न्यायालयात त्यांनी स्वत:साठी सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहेच शिवाय त्यांनी सीसीटीव्ही फुटेजमधील पत्नीच्या मारहाणीचे व तोडफोडीचे पुरावे न्यायालयात सादर केले आहेत.
अजित सिंह यांचा हरियाणातील सोनीपत येथील सुमनसोबत 9 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला. सुरुवातीचे दिवस सुखात गेले. पण, कालांतराने सुमन हिने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. तिने छोट्या छोट्या कारणावरून पतीला मारायला सुरुवात केली.
कधी बॅटने, कधी पाण्याची बाटली फेकून मारणे, कधी पाहत मिळेल ते भांडे फेकून मारणे असे प्रकार घडत होते. पुढे पुढे या प्रकारात वाढ झाली. आधी सार्वजनिक लज्जेखातर त्यांनी तक्रार केली नाही. पण, पत्नीच्या वाढत्या अत्याचाराला कंटाळून अखेर त्यांनी कायद्याची मदत घ्यायचे ठरवलं.
अजित सिंह यांनी सर्व पुरावे न्यायालयात सादर केले. तसेच, पत्नीच्या जाचापासून संरक्षण देण्याची विनंती न्यायालयाला केली. स्वत:साठी सुरक्षा पुरवण्याची मागणीही त्यांनी केली. त्यावर न्यायालयाने त्यांच्या भल्यासाठी पोलिसांना त्यांच्या संरक्षणाचे आदेश दिले.