Viral Video | कच्चा बदामनंतर आता `कच्चा अंगूर` गाण्याचा सोशलमीडियावर धुमाकूळ, पाहा व्हिडीओ
Kala Angoor Song: सोशल मीडियावर काला अंगूर व्हिडीओ समोर आल्यानंतर काही नेटकरी त्याला प्रचंड पसंती देत आहेत. तर, काही लोक म्हणतात की बस... आता तर हद्दच झाली राव...
मुंबई : Kala Angoor Song:'काचा बदाम' गाण्यानंतर आता 'काला अंगूर' या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नुकतेच एक काका 'काचा अमरूद' हे गाणे गाताना सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता त्याच काकांचं 'काला अंगूर' हे गाणं सोशलमीडियावर व्हायरल होत आहे. हे काका रस्त्यावर फिरतात आणि गाणी गात फळे विकतात.
'काला अंगूर' या गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ
आता तेच 'काका' गाडीवर बसून 'काळी द्राक्षे' विकताना आणि त्यावर गाणी म्हणताना दिसतात. सोशल मीडियावर हा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोक त्याला प्रचंड व्हायरल करीत आहेत. काही लोक म्हणतात की आता तर हद्दच झाली. काला अंगूर गाणं ऐकूण काही नेटकरी टीका देखील करीत आहेत.
ज्या पद्धतीने 'कच्छा बदम' आणि 'कच्छा अमरूद' या गाण्यांनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला, आता 'काला अंगूर' देखील त्याच मार्गावर आहे. त्यामुळे सोशल मीडिया वापरकर्त्यांना वेड लागले आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हातगाडीवर बसलेले 'चाचा' चहाचे घोट घेताना 'काला अंगूर' गाताना दिसत आहेत. व्हिडिओ पाहून अनेकजण पोट धरून हसत आहेत.
इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर
हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. इन्स्टाग्रामवर saliminayat नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
व्हिडिओ शेअर करण्यासोबतच युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'लेलो अंगूर'. पश्चिम बंगालमधील शेंगदाणे विक्रेते भुबन बद्यकर 'कच्छा बदाम' गाणे गाऊन इंटरनेटवर प्रसिद्ध झाला होता. 'कच्चा बदाम' या गाण्यावर लाखो-करोडो रील्स तयार झाल्या आहेत.
Kala Angoor Song, Kala Angoor Song Viral,Kacha Badam Vs Kacha Amrood, Kacha BADAAM, Kacha Amrood Remix, Kala Angoor Remix, Kacha Amrood, Kacha Amrood Song Viral, Grapes For Immunity,
Zara Hatke, Ajab Gajab,