पाहा Video, देशातील `या` भागात मोठं संकट, डोंगर कोसळून बंद झाला नदीचा महाकाय प्रवाह
नदीच्या प्रवाहात कोसळलेला हा डोंगर इतका मोठा होता की....
नवी दिल्ली : देशात नागरिक कुठे कोरोनाच्या संकटातून डोकं वर काढत नाहीत, तोच अनेक भागांमध्ये विविध प्रकारची आणि तीव्रतेची संकटं उभीच असल्याचं भीतीदायक चित्र पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal pradesh) याची स्पष्ट प्रचिती येत आहे. हिमाचलमध्ये काही दिवसांपूर्वीच किन्नौर येथे एक दरड कोसळण्याची घटना घडली होती.
ज्यानंतर या घटनेतून दुर्घटनाग्रस्तांचा आकडाच समोर येत नाही आणि बेपत्ता नागरिकांचा शोध लागत नाही, तोच आणखी एक मोठी घटना घडल्याचं पाहायला मिळत आहे.
लाहौलमध्ये (lahaul) असणाऱ्या पट्टन खोऱ्यात 13 ऑगस्ट (शुक्रवार) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास एक मोठा डोंगरच मोठ्या वेगानं नदीच्या महाकाय प्रवाहातच कोसळला. नदीच्या प्रवाहात कोसळलेला हा डोंगर इतका मोठा होता की, संपूर्ण चिनाब नदीचा प्रवाहच एका ठिकाणी थांबला. नालदा गावाजवळ ही घटना घडली.
Indian Army Recruitment 2021: 8वी-10 आणि 12 वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी
आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुदेश कुमार मोक्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'नदीचा प्रवाह एकाच ठिकाणी थांबला असून, त्यातून अवघ्या 10-15 टक्के पाणीच पुढे जात आहे. हे संकट पाहता किनाऱ्यालगतच्या गावांतून स्थानिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केलं असून, इथं हवाई मार्गानं या भागाची पाहणी करण्यासाठी हेलिकॉप्टर तैनात केले आहेत.'
लाहौल खोऱ्यातील या गावामध्ये एनडीआरएफची टीमही तैनात करण्यात आली आहे. शिवाय नदीपात्रापासून नजीक असणाऱ्या गावांतून नागरिकांना उंचावरील गावांमध्ये पाठवलं असल्याची माहितीही त्यांनी दिली.
किन्नौर दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा 15 वर
11 ऑगस्टला (kinnaur) किन्नौरमध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 15 नागरिकांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. यामध्ये अजूनही काहीजण बेपत्ता असल्याचं कळत आहे.