नवी दिल्ली: कोरोना नियंत्रणात येत असल्यानं अनेक ठिकाणी हळूहळू पुन्हा गोष्टी अनलॉक होत आहेत. मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग बंद पडले. काहीजणांच्या नोकऱ्या गेल्या. या सगळ्या परिस्थितीमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. काहीजण अजूनही नोकरीच्या शोधात आहेत. अशा सर्वांसाठी भारतीय सैन्यदलात नोकरी कऱण्याची सुवर्णसंधी आहे.
भारतीय सैन्यदलामध्ये 8वी, 10 वी आणि 12 पास असलेल्या उमेदवाऱ्यांसाठी नोकरीची संधी आहे. यासंदर्भात नुकतीच जाहिरात निघाली आहे. यासाठी उमेदवारांना अर्ज करण्याची 15 जुलै 2021पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अधिकृत वेबसाईटवर अर्ज करण्यात येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 25 ऑगस्ट आहे. त्यामुळे लवकर इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावा.
इच्छुक उमेदवारांनी joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करायचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार डी फार्मा पदांसाठी 6 नवंबर से 16 नंबर 2021तक कुल्लू/लाहौर स्पीति/मंडी, हिमाचल प्रदेश इथे कऱण्यात येणार आहे.
कॉन्स्टेबल जनरल ड्यूटी, कॉन्स्टेबल लिपिक, कॉन्स्टेबल ट्रेड्समन (8 वी पास), कॉन्स्टेबल ट्रेड्समन (10 वी पास) आणि कॉन्स्टेबल (फार्मा) या पदांवर भरतीसाठी रॅली आयोजित केली जाईल.
शिपाई जनरल ड्युटी, क्लर्क, ट्रेड्समॅन यासाठी 8 वी पास असणं आवश्यक आहे. शिपाई ट्रेडमॅनसाठी 10 वी पास असणं आवश्यक आहे. त्यासाठी 45 टक्के असणं आवश्यक आहे. या पदांची भर्ती करण्यासाठी रॅली होणार आहे. त्यावेळी फिटनेस टेस्ट आणि फिजिकल मॅनेजमेंट आणि मेडिकल टेस्ट होणार आहे. त्यानंतर एक कॉमन परीक्षा होईल त्यातून निवड करण्यात येईल.