कोची : केरळमधील (Kerala) एडायपुरम  (Edayapuram)  येथे कायद्याचं शिक्षण घेणारी मोफिया परवीन दिलशादने आत्महत्या केली आहे. मोफिया फक्त 21 वर्षांची होती.  आत्महत्येपूर्वी मोफियाने एक सुसाईड नोट देखील लिहिली आहे. 'बाबा, तुमचं म्हणणं बरोबर होतं. तो चांगला माणूस नव्हता....' असं तिने  सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. सुसाईड नोटमध्ये मोफियाने तिच्या मृत्यूसाठी पती मुहम्मद सुहेल, सासरा युसूफ आणि सासू रुखिया यांना जबाबदार धरले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'द टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, मृत मुलीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या मुलीने खोलीत लावलेल्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. मुलीचा सासरच्या मंडळींकडून  खूप छळ झाला. मुलीचा पती, सासरा आणि सासूकडून मुलीचा छळ केला जात होता.


मोफियाच्या वडिलांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी मोफियाने अलुवाच्या एसपीकडेही तक्रार केली. त्यानंतर अलुवा पोलीस ठाण्याला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानंतर अलुवाचे पोलीस निरीक्षक सीएल सुधीर यांनी दोन्ही पक्षांना पोलिस ठाण्यात बोलावले होते.


अलुवा पोलिस स्टेशनचे निरीक्षक सीएल सुधीर यांनी मोफियाचा पती मुहम्मद सुहेल आणि त्याच्‍या कुटूंबियांची बाजू घेतली. यामळे निराश झालेल्या  मोफिया गळफास लावून आत्महत्या केली.


दोघांची कशी झाली भेट 
मोफिया आणि मुहम्मद सुहेल यांची भेट फेसबुकच्या माध्यमातून झाली होती. ते काही दिवस  बोलत होते आणि नंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. यंदाच्या वर्षी एप्रिलमध्ये दोघांनी लग्न केले.


मोफियाच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, लग्नाच्या वेळी मुहम्मद सुहेलने सांगितले होते की तो यूएईमध्ये काम करतो. तो एक ब्लॉगर देखील आहे. पण लग्नानंतर सुहेलला चित्रपट निर्माता बनायचे आहे.


यासाठी त्याने मोफियाकडे हुंडा म्हणून 40 लाख रुपये मागितले. हुंडा देण्यावर मोफियाचा विश्वास नव्हता, म्हणून तिने नकार दिला म्हणून सासरच्या घरात मोफियाचा छळ होत होता.