फसवून लग्न केलेल्या बायकोसमोर, सासरी गेल्यावर नवऱ्याचं मोठं गुपीत उघड
जर नववधूसमोर तिच्या नवऱ्याचं एक असं सत्य समोर आलं, ज्यामुळे तिच्या आयुष्यावर खुप मोठा परिणाम होऊ शकतो, तर त्या मुलीची काय अवस्था होईल?
दिल्ली : लग्नानंतर प्रत्येक मुलगी आपल्या सुखी संसाराचे स्वप्न पाहाते. लग्नानंतर खरंतर मुलीच्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार असते. परंतु अशातच जर नववधूसमोर तिच्या नवऱ्याचं एक असं सत्य समोर आलं, ज्यामुळे तिच्या आयुष्यावर खुप मोठा परिणाम होऊ शकतो, तर त्या मुलीची काय अवस्था होईल? असाच एक प्रकार आग्रामध्ये घडला. जेथे लग्नानंतर नववधूला आपल्या नवऱ्याबद्दल एका अशी गोष्ट समजली, ज्यामुळे तिला धक्का बसला. खरंतर नववधूला लग्नानंतर कळले की, आपला नवरा दिव्यांग आहे. म्हणजेच त्याला चालता येत नाही आणि तो लहानपणापासून दिव्यांग आहे. ज्यानंतर तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला.
खरंतर नववधूला सात फेऱ्यांदरम्यान याबाबत संशय आणि तिने या विषयी विचारले असता, तिला सांगण्यात आले की, चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे ही समस्या निर्णान झाली आहे, परंतु काही काळानंतर ही समस्या निधून जाईल. ज्यामुळे तिने यावर विश्वास ठेवला आणि पुढील विधी पार पडल्या. परंतु हनिमूनला नवरीला कळलं की तिचा नवरा लहानपणापासूनच अपंग आहे.
तिने आपल्याशी केलेल्या फसवणुकीला विरोध केला असता सासरच्या लोकांनी तिचा छळ करण्यास सुरुवात केली. तिला मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली होती. प्रथम निघून गेल्यावर माहेरी पोहोचल्यावर वधूने आपल्यासोबत झालेल्या फसवणुकीची माहिती नातेवाईकांना दिली.
बुधवारी एसएसपी कार्यालय गाठून या महिलेनं आणि सासरच्यांविरोधात फसवणूक आणि हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला. हे प्रकरण लोहमंडी परिसरात राहणाऱ्या तरुणीचे आहे. तरुणीचे महिन्याभरापूर्वी मथुरा येथे राहणाऱ्या तरुणाशी लग्न झाले होते.
तरुणीच्या नातेवाईकाने सांगितले की, ती एका मध्यस्थामार्फत मुलाला पाहण्यासाठी गेली होती. तेव्हा तिला मुलगा खुर्चीवर बसलेला दिसला, त्याच्याशी बोलत असताना घरच्यांनी तिचे लक्ष विचलित केले. घर, दुकान आणि शेत दाखवण्याच्या बहाण्याने मुलीकडच्यांना मुलाकडचे घेऊन गेले. मुलगा आणि त्याच्या घरच्यांची परिस्थीती बऱ्यापैकी चांगली असल्याने मग जास्त काही विचार न करता ते लग्नासाठी तयार झाले होते.
परंतु आता फसवणूकीची माहिती समजल्यानंतर या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. ज्यानंतर पीडितेच्या अर्जावरून एसएसपींनी महिला पोलीस ठाण्याला चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.