मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी तडाखेबंद भाषण ठोकण्यासाठी एकदम प्रसिद्ध. गुजरातमधील विधानसभा निवडणूक प्रचारातही बुधवारी (29 नोव्हेंबर) असेच तडाखेबंद भाषण ठोकले. त्यानंतर देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचा एक फोटो भलताच व्हायरल झाला.


मोदींनी काढली इंदिरा गांधींची आठवण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मोराबी येथील रॅलीत कॉंग्रेसवर तीव्र शब्दांत निशाणा साधला. या वेळी त्यांनी माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या मोराबी दौऱ्याची आठवण काढत कॉंग्रेसवर टीका केली. इंदिरा गांधी जेव्हा मोराबीत आल्या होत्या तेव्हा नाकावर रूमाल ठेऊन आल्या होत्या, असे मोदी म्हणाले. आपले म्हणने पटवून देताना त्यांनी एका मासिकात छापून आलेल्या छायाचित्राचा हवाला देत स्वत:च्या नाकावरही हात ठेवला. मोदींच्या या कृतीनंतर इंदिरा गांधीचा तो फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला.



(छायाचित्र सौजन्य : चित्रलेखा (गुजराती)) 


 


इंदिराजींच्या 'त्या' फोटोचा संदर्भ काय?


पंतप्रधान मोदींनी इंदिरा गांधीच्या ज्या फोटोचा दाखला देत भाषणात उल्लेख केला. तो फोटो 1979 मधला असून, चित्रलेखा मासिकाने छापला होता. 11 ऑगस्ट 1979मध्ये मच्छू धरण फुटले होते. ज्यानंर सर्व शहर पाण्याखाली गेले. या धक्क्यामुळे अनेक लोकांचे प्राण गेले, अनेकांना कायमचे अपंगत्व आले. अनेक बेघर झाले. विकिपिडियाने देलेल्या आकडेवारीनुसार या धक्क्यात 1800 ते 25000 लोकांच मृत्यू झाला होता. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मोरबीचा दौरा केला होता. दरम्यान, दुर्गंधीच इतकी होती की, इंदिरा गांधीच काय उपस्थितांपैकी सर्वांनाच नाकाला रूमाल लावावे लागले होते.