नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढत चाचला आहे. राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत छोटी मुंबई म्हटल्या जाणाऱ्या इंदौर शहरात कोरोनाचे १४ रुग्ण आढळले आहेत. मध्य प्रदेशच्या इंदौर शहरात कोरोना वायरस बाधित रुग्णांची संख्या आता ८९ वर पोहोचली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१४ कोरोना बाधित रुग्णांपैकी ३ महिला तर ११ पुरुष आहेत. या रुग्णांचे वय १९ ते ६० दरम्यानचे असल्याची माहिती शासकीय महात्मा गांधी स्मृति चिकित्सा महाविद्यालयाच्या अधिकाऱ्याने दिली. गेल्या नऊ दिवसांमध्ये कोरोना वायरसमुळे इंदौरमध्ये ५ रुग्णांचा मृत्यू झाला. 



इंदोर हे शहर देशातील सर्वाधिक वायरस संक्रमण होणाऱ्या शहरांच्या यादीत गेले आहे. यातून बचाव करण्यासाठी प्रशासनाने २४ मार्चपासून इंदौरच्या सीमेवर कर्फ्यू लावला आहे.


कोरोनाचे देशभरात ५६ बळी, तर २ हजार ३०१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात बळींचा आकडा २१ केला आहे. राज्यात ३६ तासांत ८३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्यत वाढ दिसून येत आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातही रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तर जगभरात कोरोनाचा हाहाकार दिसून येत आहे. आतापर्यंत १० लाख जणांना लागण तर ५० हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इटलीत सर्वाधिक १३ हजार ९०० जणांचा मृत्यू झाला आहे तर अमेरिकेत एकाच दिवसात हजारावर बळी गेले आहेत.


लॉकडाऊनमुळे काश्मीरच्या दुर्गम भागात अन्नधान्याचा पुरवठा पुरेसा होत नाही. ही अडचण लक्षात घेऊन लष्कराने जम्मू काश्मीरच्या दुर्गम भागात अन्नधान्यचा पुरवठा सुरू केला आहे. स्थानिक युनिट्समधून गाड्यांमधून धान्याची पोती घेऊन जाऊन आर्मीचे जवान वाटप करत आहेत. सैनिकांच्या या प्रयत्नांमुळे स्थानिकांनी आनंद व्यक्त केलाय. गव्हाचं पीठ, तांदुळ या अन्नधान्यांचं वाटप इथे गावागावात केलं जातंय. भारत पाकिस्तान सीमेवर सध्या लॉकडाऊनमुळे गावांमधली दुकानं बंद आहेत. मोठ्या शहरांकडे जाण्यासाठी कोणतीही वाहनं नाहीत. त्यामुळे सीमावर्ती भागातल्या ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत.