प्रद्युम्न ठाकूर हत्येनंतर रायन इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक गायब?
गुरुग्रामच्या प्रद्युम्न ठाकूर हत्या प्रकरणी रायन इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ऑगस्टिन पिंटो, व्यवस्थापकीय संचालिका ग्रेस पिंटो आणि सीईओ रायन पिंटो अडचणीत सापडले आहेत.
नवी दिल्ली : गुरुग्रामच्या प्रद्युम्न ठाकूर हत्या प्रकरणी रायन इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ऑगस्टिन पिंटो, व्यवस्थापकीय संचालिका ग्रेस पिंटो आणि सीईओ रायन पिंटो अडचणीत सापडले आहेत.
प्रद्युम्नच्या हत्येनंतर हे तिघे कुठे आहेत हे कोणालाही माहिती नाही. या प्रकरणी पिंटो कुटुंबीयांनी मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. मुंबईत बोरीवलीच्या अशोका टॉवरच्या ए विंगमधील 101, 102 आणि 103 हे तीन रुम्स ऑगस्टिन पिंटो यांच्या नावावर आहेत. मात्र गेल्या तीन वर्षांपासून पिंटो कुटुंबीय इथं राहत नसल्याची माहिती सुरक्षारक्षकांनी दिली आहे.