Viral Wedding Dance: लग्न आणि त्यातही भारतीय लग्न म्हटल्यावर ओघाने डान्स हा आलाच. पूर्वीतर फक्त वरातीमध्ये नाचण्याची पद्धत होती आता मात्र लग्नाआधी संगीतच्या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. संगीत आणि संगीत सेरिमनीमध्ये होणारे डान्स सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात यात शंका नाही. पण वरातीमधील डान्सला तोड नाही असं म्हणणारेही अनेकजण आहेत. वरातीमध्ये अगदी नागिण डान्सपासून ते फुगड्यांपर्यंत वेगवगेळ्या पद्धतीने नाचून आनंद साजरा केला जातो. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये अगदीच मजेदार डान्स करणारा तरुण दिसत आहे. खरं म्हणजे हा डान्स पाहून तुम्हालाही 'अरे भाई, हे काय आहे?' असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही.


व्हिडीओत आहे तरी काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल व्हिडीओमधील तरुणाचा डान्स पाहून तुम्ही नागिण डान्स आणि वरातीमधील इतर अनेक स्टेप्स विसरुन जाल असं म्हटलं जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या डान्सला नेटकऱ्यांनी 'मोर डान्स' असं नाव दिलं आहे. हा 'मोर डान्स' पाहून हसून हसून तुमच्या डोळ्यातून पाणी येईल असंही हा व्हिडीओ पाहणाऱ्या अनेकांचं म्हणणं आहे. हा व्हिडीओ एखाद्या पार्टीत असल्याचं प्रथमदर्शनी वाटत आहे. डान्स फ्लोअरवर काही तरुण मंडळी वेगवेगळ्या डान्स स्टेप्स करताना दिसत आहेत. मात्र या सर्वांमध्ये एका मुलाचा डान्स इतरांहून उठून दिसत आहे. या मुलाने केलेला डान्स पाहण्यासाठी आजूबाजूचे सारेचजण काही वेळ थांबल्याचंही या व्हिडीओत दिसत आहे.


इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ योगेश क्लब नावाच्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्याला 75 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर 2 लाखांहून अधिक जणांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे.



अनेकांच्या मजेदार कमेंट्स...


मोर डान्सचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी मजेदार प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एकाने हा मोर डान्स पाहून मोराला एखादा आजार असल्यासारखं वाटतंय असं म्हटलं आहे. अन्य एकाने या मोराचा डान्स पाहून आज हा अंड देऊनच राहणार असं वाटतंय अशी मजेदार प्रतिक्रया नोंदवली आहे. अन्य एकाने या भावाच्या डान्सला तोड नाही अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे.