जबरदस्त! विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात केली `इतक्या` कोटींची गुंतवणूक
जुलैमध्ये FPI ने शेअर बाजारात सुमारे 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
Foreign Portfolio Investors: सलग नऊ महिने विक्री केल्यानंतर विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPIs) भारतीय शेअर बाजारात परतले आहेत. जुलैमध्ये FPI ने शेअर बाजारात सुमारे 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. डॉलर निर्देशांकातील नरमाई आणि कंपन्यांच्या चांगल्या तिमाही निकालानंतर FPI (Foreign Portfolio Investors) पुन्हा एकदा खरेदीदार बनले आहेत.
गुंतवणूक तज्ञांच्या मते कच्चा तेलाच्या किमतीवरील परिणामामुळे आणि भारतीय तसेच जागतिक बाजारातील तेजीमुळे सध्या FPI नी भारतीय मार्केटमध्ये चांगली गुंतवणूक केली आहे.
जुलैमध्ये FPIs ने भारतीय शेअर बाजारात 4,989 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. यापूर्वी FPIs हे सलग नऊ महिने विक्रेते म्हणून मार्केटमध्ये दिसले होते. गेल्या वर्षी ऑक्टोबर ते या वर्षी जूनपर्यंत त्यांनी भारतीय शेअर बाजारातून 2.46 लाख कोटी रुपये इतकी उलाढाल केली होती.
यापूर्वी जूनमध्ये FPI ने भारतीय इक्विटीमधून 50,145 कोटी रुपये काढले (withdraw) आहेत. मार्च 2020 नंतर एका महिन्यात काढलेली ही सर्वाधिक रक्कम आहे. त्यावेळी FPIs ने भारतीय स्टॉक एक्स्चेंजमधून 61,973 कोटी रुपये काढले होते.
भारताने महागाई बऱ्यापैकी आटोक्यात ठेवल्याने परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतले आहेत.अमेरिकेच्या फेडरल बँकेने व्याजदर वाढवले आहेत त्याचा परिणाम म्हणून भारतीय शेअर बाजार खाली खाली जात राहील असे चित्रं होते परंतु याचा फटाका भारताला बसणार नसल्याचा इशाराही काही तज्ञांनी दिला होता.