मुंबई : राजस्थानमधून (Rajsthan) मोठी बातमी समोर आली आहे. ओडिशाच्या धर्तीवर राजस्थानमध्येही सरकारी भरतीमधील कंत्राटी पद्धत (contract employee) रद्द केली जाणारंय. त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना नियमित केलं जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.  याआधी ओडिशा राज्यातील (Odisha Government) जवळपास 57 हजार कर्मचाऱ्यांना नियमित करणार असल्याचं मुख्यमंत्री नवीन पटनायक (Navin Patnayak) यांनी सांगितलं. त्यानंतर आता राजस्थाननेही हे पाऊल उचललंय. आता महाराष्ट्रातही अशाच पद्धतीनं कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित केलं जाणार का. याकडे सर्वाचं लक्ष लागलंय. (after odisha contract system in government recruitment will be abolished in rajasthan too)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी 15 ऑक्टोबरला ओडिशा सरकारने  हा निर्णय घेतला होता.  ओडिशा सरकारने राज्यातील जवळपास 57 हजार कर्मचा-यांना नियमत करणार असल्याचं मुख्यमंत्री नवीन पटनायक (Chief Minister Naveen Patnaik) यांनी सांगितलं होतं. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अनेक दिवसांपासून नोकरी नियमित करण्याची मागणी केली होती. 


दरम्यान आता ओडीशा आणि राजस्थाननंतर महाराष्ट्र राज्य सरकार असा निर्णय घेणार का, याकडे राज्यातील जनतेचं लक्ष असणार आहे.