नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या संसर्गाची तिसरी लाट लवकरच देशात पसरू शकते. तज्ज्ञांच्या मते देशाला पुढील काही महिन्यात तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली नाही. दुसऱ्या लाटेने असंख्य रुग्णांचे जीव घेतले आहे. आरोग्य व्यवस्था कोलमडली होती. ऑक्सिजन आणि औषधांची कमतरता भासत होती. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर देशातील आरोग्य सुविधा वाढवण्याची तयारी केली जात आहे.
 
 रॉयटर्स पोलने इशारा दिला आहे की, तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. वाढत्या आरोग्य सुविधांमुळे दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेला सरकार चांगल्या प्रकारे नियंत्रित करू शकते. 


लसीकरणामुळे कोरोना कमी होणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 जगभरातील तज्ज्ञांनी केलेल्या एका अभ्यासात दिसून आले आहे की, लसीकरणामुळे कोरोना संसर्गाचा प्रभाव कमी झाला आहे. तसेच भारतात ऑक्टोबर पर्यंत तिसरी लाट धडकू शकते असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.


--------------------------------


मुंबई : गेल्या वर्षभरापासून देशातचं नाही संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. माणसांनंतर आता प्राण्यांना देखील कोरोनाची लगाण होत असल्याचं समोर आलं. चेन्नईच्या एका बागेत 9 सिंहांना कोरोनाची लागण झाली आहे. चेन्नईतील अरिग्यार अन्ना जूलॉजिकल पार्कमधील नऊ सिंह कोरोना पॉझिटीव्ह आढळले. नऊ पैकी चार सिंहांची चाचणी जीनोम सिक्वेन्सींग भारतीय कृषी संशोधन परिषद - नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हाई सिक्योरिटी एनिमल डिसिजेस येथे करण्यात आली. 


भोपाळमध्ये करण्यात आलेल्या जीनोम सिक्वेंसिंगच्या अहवालानुसार चार सिंह डेल्डा व्हॅरिएन्ट संक्रमित आहेत. अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार, 'चार नमूने जीनोम सिक्वेंसिंग NIHSAD याठिकाणी पाठवण्यात आले होते. ' डेल्डा व्हेरिएन्ट सर्वप्रथम भारतात आढळला होता. आता डेल्टा व्हेरिएन्टने सर्वत्र थैमान घातलं आहे.