मुंबई : दिवाळीच्या एक दिवस आधी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली आहे. आता पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्याचवेळी डिझेलच्या दरात 10 रुपयांनी कपात करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवाळीच्या पूर्वसंध्येला भारत सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याची घोषणा केली आहे. उद्यापासून म्हणजेच गुरुवारपासून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे 5 रुपये आणि 10 रुपयांनी कमी होणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात पेट्रोलच्या तुलनेत दुप्पट असेल. आगामी रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. या दिलासामुळे पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी होण्याची आशाही वाढली आहे.



दुसरीकडे गोवा सरकारने ही नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी ही मोठी घोषणा केली आहे. गोव्यात पेट्रोल 7 रुपयांनी स्वस्त होणार आहे. तसेच कर्नाटक, आसाम आणि त्रिपुरामध्ये ही पेट्रोलचे दर 7 रुपयांनी कमी करण्यात आले आहेत.