Attack on US Ex President Donald Trumph: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित असल्याची माहिती आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची याबाबत चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांनी पोस्ट करत या घटनेचा निषेधही नोंदवला आहे. 


काय म्हणाले पंतप्रधान मोदी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक्सवर पोस्ट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, माझे मित्र आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मी प्रचंड चिंतेत आहे. मी या घटनेची निंदा करतो. राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला स्थान नाही. त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं अशी माझी इच्छा आहे. आमच्या संवेदना मृत आणि जखमींच्या कुटुंबियांसोबत आहेत.”


अमेरिकेच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, डोनाल्ड ट्रम्प पेनसिल्व्हेनियाच्या बटलरमध्ये एका निवडणूक रॅलीला संबोधित करत होते. पेनसिल्व्हेनियाच्या ग्रेटर पिट्सबर्ग भागातील बटलर काउंटीमध्ये आयोजित करण्यात आली होती. ते बोलत असताना अचानक त्यांच्यावर हल्लेखोरांनी हल्ला केला. हल्लेखोरांनी एकामागून एक अनेक राऊंड गोळीबार केला. सीक्रेट सर्व्हिस टीमने त्याला तत्काळ तिथून बाहेर काढलं. बटलर काउंटी डिस्ट्रिक्ट ॲटर्नी रिचर्ड गोल्डिंगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित बंदूकधारी व्यक्तीला गोळी मारण्यात आली. यावेली रॅलीत सहभागी झालेल्या एकाचा मृत्यू झाला. 


ट्रम्प यांच्या रॅलीमध्ये नेमकं काय घडलं?


माजी अध्यक्षांच्या रॅलीत जसा गोळीबारीचा आवाज आला तसा ट्रम्प यांनी उजव्या हाताने उजवा कान धरला. दरम्यान हे पाहण्यासाठी त्यांनी हात खाली आणला आणि नंतर व्यासपीठाच्या मागील बाजूला ते गुढघ्यावर बसले. यावेळी क्षणाचाही विलंब न करता सीक्रेट सर्व्हिस एजंट्सनी लगेच त्यांना घेरलं. लगेच मिनिटानंतर ते बाहेर पडले, त्यांची लाल "मेक अमेरिका ग्रेट अगेन" टोपी काढली आणि ते "थांबा, थांबा" असे म्हणत होते. यानंतर सीक्रेट सर्व्हिस एजंट त्यांना कारमध्ये घेऊन निघून गेले.


या घटनेनंतर ट्रम्प यांच्या उजव्या कानावर आणि चेहऱ्यावर रक्ताचे डाग दिसून आले. दरम्यान ट्रम्प यांच्या कानाजवळ रक्त कसं आलं आणि ते कसे जखमी झाले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. व्हिडिओमध्ये ट्रम्प यांच्या उजव्या कानाला आणि चेहऱ्याच्या उजव्या बाजूला रक्त दिसून येतंय. 


दरम्यान सीक्रेट सर्व्हिसने यासंदर्भात एक निवेदन जाहीर केलं आहे. यावेळी एका निवेदनात म्हटलंय की, ट्रम्प सुरक्षित आहेत आणि त्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. ट्रम्प मंचावरून खाली आल्यानंतर लगेचच पोलिसांनी रॅली घेण्यात आलेलं मैदान रिकामं केलं.