PM Narendra Modi inaugurated Surat Diamond Bourse : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींना डायमंड सिटी गुजरातला दोन मोठ्या भेटवस्तू दिल्या आहे. पहिली भेट म्हणजे सुरत विमानतळाची नवीन टर्मिनल इमारत आणि दुसरी जगातील सर्वात मोठे ऑफिस कॉम्प्लेक्स (Surat Diamond Bourse). सुरत येथे पोहोचल्यानंतर आणि नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सूरत शहराजवळील खजोद गावात बांधलेल्या सूरत डायमंड बोर्स (SDB) इमारतीचे उद्घाटन केले. हे मोदींच्या गॅरंटीचे उदाहरण आहे. सुरत शहराच्या वैभवात आज आणखी एका हिऱ्याची भर पडली असून हा हिरासुद्धा छोटा नसून तो जगातील सर्वोत्तम आहे, असे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"सुरतच्या वैभवात आज आणखी एका हिऱ्याची भर पडली. आजकाल तुम्ही सर्वजण 'मोदींच्या गॅरंटी'बद्दल खूप चर्चा ऐकत असाल. नुकत्याच झालेल्या निवडणूक निकालानंतर ही चर्चा आणखी वाढली आहे. पण सुरतच्या जनतेला 'मोदींची गॅरंटी' फार पूर्वीपासून माहीत आहे. येथील कष्टकरी जनतेने 'मोदींची गॅरंटी' प्रत्यक्षात उतरताना पाहिली आहे आणि 'सूरत डायमंड बोर्स' हेही या हमीचे उदाहरण आहे. सुरत एकेकाळी सन सिटी म्हणून ओळखले जात होते. या शहरातील लोकांनी आपल्या मेहनतीने ते डायमंड सिटी आणि सिल्क सिटी बनवले. आज सुरत हे लाखो तरुणांच्या स्वप्नांचे शहर आहे आणि आता सुरत आयटी क्षेत्रातही प्रगती करत आहे," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.



"सर्वांना माहीत आहे की, गेल्या 10 वर्षात भारत आर्थिक शक्ती म्हणून 10व्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. आता मोदींनी देशाला खात्री दिली आहे की त्यांच्या तिसऱ्या दशकाच भारताचा जगातील टॉप-3 अर्थव्यवस्थांमध्ये नक्कीच समावेश होईल. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर वातावरण भारताच्या बाजूने आहे. आज जगभरात भारताची प्रतिष्ठा शिखरावर आहे. जगभरात भारताची चर्चा होत आहे. मेड इन इंडिया आता एक मजबूत ब्रँड बनला आहे. म्हणून मी तुम्हा सर्वांना म्हणेन संकल्प करा आणि ते प्रत्यक्षात आणा," असेही पंतप्रधान म्हणाले.


'गुजरातची प्रगती झाली तर देशाची प्रगती'


"तुमच्या सर्वांचे सामर्थ्य वाढवण्यासाठी सरकार सुरतचंही सामर्थ्य वाढवत आहे. आमचं सरकार सूरतमध्ये आधुनिक पायाभूत सुविधांसाठी विशेष प्रयत्न करत आहे. आज सूरतमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ आहे. सूरतमध्ये मेट्रो रेल्वे सेवा आहे. सूरत पोर्टमध्ये अनेक महत्त्वाच्या उत्पादनांची एक्स्पोर्टसाठी बंदर आहे, सूरत सातत्याने आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्राशी जोडलं जातंय. सूरतला बुलेट ट्रेन प्रकल्पाशीही जोडलं आहे. सुरतची प्रगती झाली तर गुजरातची प्रगती होईल आणि गुजरातची प्रगती झाली तर माझ्या देशाची प्रगती होईल," असंही मोदी म्हणाले.