नवी दिल्ली : सध्या सगळीकडे परीक्षांची धामधूम बघायला मिळत आहे. उत्तर प्रदेशमध्येही परीक्षा सुरू आहेत. पण इथे कॉपीविरहीत परीक्षेचा दावा फोल ठरतो आहे. 


पिस्तुलाच्या जोरावर बेधडक कॉपी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच एक व्हिडिओ समोर आला असून यात महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी सर्रासपणे कॉपी करताना दिसत आहे. इतकेच नाहीतर या खोलीत एक व्यक्तीही दिसतो आहे ज्याच्या कमरेवर पिस्तुल लटकलेलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा व्यक्ती ना परीक्षार्थी होता ना कॉलेजचा कर्मचारी होता. व्हिडिओ समोर आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. 


शिवसेनेने केली पोलखोल


हे घटना डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या बिचपुरी रोड येथील कृष्णा अकॅडमीतील आहे. इथे बीए प्रथम वर्षाची परीक्षा सुरू होती. हे प्रकरण शिवसेनेचे जिल्हा प्रमुख वीनू लवानिया यांनी केलाय. त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांना कॉलेजमध्ये कॉपी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे तिथे शिवसेना कार्यकर्ते पोहोचले आणि त्यांनी हा सगळा प्रकार कॅमेरात कैद केली. 


कॉपीचं साम्राज्य का?


रेकॉर्ड करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कमरेल पिस्तुल बांधून दिसतो आहे. तर विद्यार्थी पुस्तकं उघडून आरामात कॉपी करत आहेत. हा व्यक्ती ना परीक्षक होता, ना विद्यार्थी होता, ना कॉलेजचा कर्मचारी. या रूममध्ये एक्झामिनरही नव्हता. केवळ हा बंदुकधारी व्यक्ती होता.