पुतण्याचा काकीवर जडला जीव; सर्वजण उडवाचे खिल्ली! काकाने बहाण्याने बोलावून पुढे जे केलं ते धक्कादायक
Agra Crime: कुटुंबीय आणि इतर लोक माझी खिल्ली उडवत असत. त्यामुळे आपण टोकाचे पाऊल उचलल्याचे लक्ष्मणने पोलिसांना सांगितले.
Agra Crime: पवित्र नात्यांना जेव्हा लोभ, लालसा, अनैतिक संबंधांचा वारा लागतो तेव्हा कुटुंबात नको ते घडत जाते. आग्रा येथील खेरागड पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक प्रकार समोर आला. यामध्ये अनैतिक संबंधातून छातीत गोळ्या घातल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या घटनेतील आरोपीला जेलची हवा खाण्यासाठी पाठवलंय. दरम्यान आरोपीने असे टोकाचे पाऊल का ऊचलले? याची कहाणी समोर आली आहे. पत्नीसोबत आपला पुतण्या जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोपीच्या लक्षात आले होते. याचा राग मनात ठेवून पतीने पुतण्याचे आयुष्य संपवून टाकले. लक्ष्मण असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव असून तो राजस्थानमधील बारी सायपळ येथे राहायचा. माझ्या पत्नीचे पुतण्यासोबत संबंध होते. यामुळे कुटुंबीय आणि इतर लोक माझी खिल्ली उडवत असत. त्यामुळे आपण टोकाचे पाऊल उचलल्याचे लक्ष्मणने पोलिसांना सांगितले.
राजस्थानमधील बारी सायपळ येथे लक्ष्मण आणि नीतूचा संसार सुरु होता. 7 वर्षांपुर्वी त्यांचा विवाह झाला होता. दोघांना 2 मुले आहेत. दरम्यान नितू गेल्या 5 महिन्यांपासून पुतण्या कंचनसोबत राहत होती, असे आरोपीने पोलिसांना सांगितले. तिने माझ्यासोबत राहण्यास नकार दिला होता. दोन मुले वडील लक्ष्मणसोबत राहत होती.
नीतूने घटस्फोटासाठी कोर्टात केस दाखल केली होती. यामुळे लक्ष्मण दिवसेंदिवस त्रस्त होत चालला होता. त्याने रविवारी नीतूला बहाण्याने घरी बोलावले. मुलांना भेटायला ये असे तिला सांगितले. मुलांचे नाव ऐकून नीतू भावूक झाली. ती लगेच लक्ष्मणच्या घरी आली. सोबत कंचनदेखील आला होता.
इकडे पती लक्ष्मणला कंचनचा सूड घ्यायचा होता. त्याच्या हातात पिस्तूल होती. त्याने क्षणाचा विलंब न लावता कंचनच्या छातीत गोळी झाडली. गोळीचा आवाज आल्यानंतर घरात आजुबाजूचे लोक गोळा झाले. त्यांनी लक्ष्मणला मारहाण केली. त्याच्या हातातील पिस्तूल खेचून घेतील आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
कंचन हा पत्नी नितू हिचा नात्याने पुतण्या होता. माझी पत्नी पुतण्याकडे राहत होती. तिला मी अनेकदा समजावून सांगितले. पण, ती परत यायला तयार नव्हती, असे लक्ष्मणने पोलिसांना सांगितले. मी कंचनलाही समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यानेही ऐकले नाही. दोघांच्या संबंधावरुन लोक माझी चेष्टा करायचे. त्यामुळे मी कट रचल्याची कबुली आरोपी लक्ष्मणने पोलिसांसमोर दिली.
दरम्यान लक्ष्मणने यापूर्वी पिस्तूल खरेदी केले होते. थंड डोक्याने हा खून करण्यात आलाय. कुठल्यातरी बहाण्याने त्याने कंचनला बोलावले आणि त्याचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आरोपीचा भाऊ प्रकाश याने यासंदर्भा फिर्याद दाखल केली. यानंतर पोलिसांनी लक्ष्मणवर खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी हत्येत वापरलेले पिस्तूलही जप्त केल्याची माहिती समोर येत आहे.