लखनऊ : उत्तर प्रदेसमधील आग्रा एक्स्प्रेस हायवेवर आज सकाळी १० वाजल्यापासून ते दुपारी २ वाजेपर्यंत दरम्यान भारतीय वायूदल एक्सप्रेस हाय वेवर लँडिग टच डाऊनचा सराव सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामध्ये मिराज-२०००, जग्वार, सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानं एक्स्प्रेस हाय वेवर उतरण्याचा सराव करण्यास सुरुवात केलेय. जमिनीला स्पर्श करत पूर्ण न उतरता हवेत झेप घेत हा सराव होणार आहे. 


तसेच पहिल्यांदाज एएन-३२ हे मालवाहू जहाज टच डाऊन करेल. एकूण २० लढाऊ विमाने-मालवाहू विमान या सरावात सहभाग घेतील. 


आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी एक्सप्रेस हाय वे चा वापर लढाऊ विमानं आणि मालवाहू विमानांना करता यावा यासाठी वायू दल हा सराव करणार आहे. 


काही महिन्यांपूर्वी याच एक्सप्रेस हाय वेवर मिराज-२००० ने टच डाऊनचा सराव केला होता.