मार्कशीटवर छापले सलमान, राहुल गांधींचे फोटो
उत्तर प्रदेशच्या आग्रा युनिर्व्हसिटीमधील बनावट मार्कशीटचा वाद अद्याप थांबलेला नाहीये. यातच आणखी एक घटना समोर आलीये.
आग्रा : उत्तर प्रदेशच्या आग्रा युनिर्व्हसिटीमधील बनावट मार्कशीटचा वाद अद्याप थांबलेला नाहीये. यातच आणखी एक घटना समोर आलीये.
एकावर सलमान तर दुसऱ्यावर राहुल गांधी
यावेळी आग्रा युनिर्व्हसिटीने बीएच्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या मार्कशीटवर अभिनेता सलमान खानचा फोटो छापलाय. इतकंच नव्हे तर दुसऱ्या एका मार्कशीटवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचा फोटो छापण्यात आलाय.
मार्कशीट तपासताना प्रकार आला समोर
जेव्हा विद्यार्थ्यांच्या मार्कशीट तपासल्या जात असताना सलमान आणि राहुल गांधींचे फोटो असलेल्या मार्कशीट समोर आल्या. मार्कशीटच्या छपाचे काम एका प्रायव्हेट एजन्सीला देण्यात आलेय.
सलमान खान आणि राहुल गांधीचा फोटो असलेली मार्कशीट पाहून चर्चेला एकच उधाण आले. ज्या मार्कशीटवर सलमानचा फोटो छापण्यात आला होता ती अमृता सिंह मेमोरियल डिग्री कॉलेज अलीगडच्या विद्यार्थ्याची होती. या विद्यार्थ्याला परीक्षेत ३५ टक्के मार्क मिळाले आहेत.
युनिर्व्हसिटीची माहिती
युनिर्व्हसिटीच्या माहितीनुसार, आणखी एका मार्कशीटवर राहुल गांधीचा फोटो छापण्यात आलाय. तसेच मार्कशीटवर जिथे भीमराव आंबेडकर युनिर्व्हसिटी लिहिले होते.
अशा कोणत्याही तक्रारी आल्या नाहीत
सूत्रांच्या माहितीनुसार, प्रायव्हेट एजन्सीला मार्कशीटच्या छपाईचे काम देण्यात आलेय. ही एजन्सी वांरवार अशा चुका करत आहेत. दरम्यान युनिर्व्हसिटीचे पीआरओ जीएस शर्मा यांनी मात्र अशा चुका झाल्याचे नसल्याचे म्हटलंय. अशा प्रकारच्या कोणत्याही तक्रारी समोर आल्या नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.