नवी दिल्ली : अर्थसंकल्पात सरकारने आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही परंतु कृषी उपकर लावला जाणार आहे. अर्थसंकल्पात अ‍ॅग्री इन्फ्रा डेव्हलपमेंट सेस लागू करण्यात आला आहे. यासह पेट्रोलवर प्रति लीटर अडीच रुपये आणि डिझेलवर चार रुपये प्रति लीटर कृषी उपकर लागू करण्यात आला आहे. पण उपकर लागू केल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढणार नाहीत, असे सरकारने स्पष्ट केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेट्रोल आणि डिझेलचे दर यापूर्वीच उच्च पातळीवर गेले आहेत. मुंबईत पेट्रोल ९२.८० ​​रुपये प्रतिलिटर तर डिझेल ८३.३० रुपये प्रति लिटरवर गेले आहे.


सीतारमण म्हणाल्या की, पेट्रोलवर अडीच रुपये आणि डिझेलवर चार रुपये प्रतिलिटर कृषी पायाभूत सुविधा व विकास उपकर (एसआयडीसी) लावण्याचा प्रस्ताव आहे. पेट्रोल आणि डिझेल महागलं तर इतर गोष्टींच्या किंमतीही वाढतात. कारण डिझेल महाग झाल्यामुळे ट्रक वाहतुकीचा खर्च वाढेल. पण ग्राहकांवर कोणताही अतिरिक्त बोजा पडणार नाही, असे सीतारमण यांनी म्हटलं आहे. 


कोरोना काळात सरकारच्या तिजोरीवर ताण पडला आहे. अशा परिस्थितीत कुठूनतरी अतिरिक्त रक्कम गोळा करणे आवश्यक आहे.


यासह अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2021 च्या अर्थसंकल्पात जाहीर केले की आयकर स्लॅब जसा आहे तसाच राहील. म्हणजेच यावेळी प्राप्तिकरांच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल झाला नाही. जरी अ‍ॅग्री इन्फा डेव्हलपमेंट सेस लावला गेला असला तरी.