PM Kisan: शेतकरी मायबापांच्या खात्यात २ हजार रुपये- आठवा हफ्ता जमा होणार
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता शुक्रवारी जाहीर केला.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता शुक्रवारी जाहीर केला. या योजनेचा फायदा देशातील 11.82 कोटी शेतकऱ्यांना झाला आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला 6 हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 7thव्या हप्त्याअंतर्गत गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जाहीर करण्यात आले होते.
'या' शेतक्यांना पीएम किसान योजनेंतर्गत लाभ मिळणार नाही
- असे शेतकरी जे पूर्वीचे किंवा विद्यमान घटनापाल असलेतील. शिवाय जे सध्याचे किंवा माजी मंत्री आहेत.
- महापैर किंवा जिल्हापंचायत अध्यक्ष, आमदार, एमएलसी, लोकसभा आणि राज्यसभा खासदार.
- केंद्र किंवा राज्य सरकारचे अधिकारी या योजनेतून बाहेर राहतील.
- 10 हजार रुपयांपेक्षा अधिक पेन्शन मिळणाऱ्याया शेतक्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- व्यावसायिक, डॉक्टर, अभियंता, सीए, वकील आणि आर्किटेक्ट यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
शेतकऱ्यांना मिळालेल्या आतापर्यंतच्या हप्त्यांची माहिती
- पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता - फेब्रुवारी 2019
- पीएम किसान सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता - 2 एप्रिल 2019
- पीएम किसान सन्मान निधी योजनेचा तिसरा हप्ता - ऑगस्ट 2019
- पीएम किसान सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता - जानेवारी 2020
- पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता - 1 एप्रिल 2020
- पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता - 1 ऑगस्ट 2020
- पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता - डिसेंबर 2020