Mobile Addiction Turns Fatal In Gujarat: 13 वर्षांच्या मुलीनेच आपल्या जन्मदात्या आईच्या (Mother) हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुजरातमध्ये (Gujrat) राहणाऱ्या एका महिलेसोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. गेल्या काही दिवसांपासून महिलेसोबत विचित्र प्रकार घडत होते. या घटनांचा छडा लावण्यासाठी तिने शोध घेतला असता या सगळ्या प्रकारांमागे आपलीच पोटची मुलगी असल्याचं लक्षात येताच महिलेच्या पायाखालची जमिनच हादरली आहे. (Daughter Trying To Kill Mother)


साखरेच्या डब्ब्यात सापडले किटकनाशके


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलेल्या तिच्या घरातील साखरेच्या डब्यात किटकनाशकाची पावडर आणि बाथरुमच्या फ्लोरवर फिनाइल वारंवार आढळून येत होते. त्यामुळं घाबरलेल्या महिलेने या सगळ्याचा शोध घ्यायचे ठरवले. त्यानुसार महिलेने घरातच पाळत ठेवायचे ठरवले. तेव्हा या सगळ्यामागे आपलीच मुलगी असल्याचे समजताच तिला धक्का बसला. सदर महिलेच्या मुलीचे वय हे फक्त 13 वर्षे आहे. त्यानंतर लगेचच मुलीच्या आईने हेल्पलाइनला फोन करत मुलीने केलेल्या कृत्याची माहिती दिली. 


मुलीनेच रचला हत्येचा प्लान


मुलीसोबत समुपदेशकाने चर्चा केल्यानंतर मुलीच्या वागण्याचे कारण समजले आहे. सदर मुलगी ही तिच्या आई-वडिलांवर नाराज होती. म्हणूनच आई-वडिलांना इजा व्हावी, यासाठी तिने हा कट रचला होता. तकिटकनाशके मिसळलेली साखर खावी किंवा फिनाइल टाकलेल्या फरशीवरुन पडून त्यांच्या डोक्याला गंभीर इजा व्हावी, अशी तिची इच्छा होती. 


मुलीने असे का केले?


काही दिवसांपूर्वी मुलीच्या आईने तिच्याकडून फोन हिसकावून घेतला होता. तसंच, पुन्हा फोन परत देण्यास नकार दिला होता. तेव्हापासून मुलगी आक्रमक व हिंसक झाली होती. आई-वडिलांवर असलेल्या रागातून तिने हे असं कृत्य केल्याचं समुपदेशकाने म्हटलं आहे. 


फोनचा अतिवापर महागात 


पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी रात्रभर फोनवर वेळ घालवायची. मित्र-मैत्रिणींसोबत गप्पा मारणे, सोशल मीडियावर पोस्ट किंवा रिल्स पाहणे इतकंच तिचं आयुष्य झालं होतं. याचा तिचा अभ्यास आणि सामाजिक जीवनावर परिणाम होत होता. म्हणूनच आम्ही तिच्याकडून फोन काढून घेतला होता. पण ती इतकी सोशल मीडिया अॅडिक्ट असेल, असं आम्हाला वाटलं नव्हतं. 


13 वर्षांनंतर घरात मुलं जन्माला आलं


पोटचीच मुलगी जीवावर उठल्यामुळं पालक घाबरले आहेत. या जोडप्याच्या लग्नाच्या 13 वर्षांनतर मुलीचा जन्म झाला होता. त्यांनी तिच्या पालनपोषणात कोणतीही कसर सोडली नव्हती. मुलगी मोठ्या कोड कौतुकात वाढली होती. पण मुलीने उचललेल्या या पावलामुळं त्यांना धक्का बसला आहे.