ताजमहाल कसा साकारला असेल? RARE VIDEO समोर
Viral video : हत्ती, घोडे, उंट... कसा वाहून आणला असेल संगमरवर? पाहा ताजमहाल आकार घेतानाचा एक अद्वितीय व्हिडीओ
Taj Mahal Video : प्रेम आणि त्यागाचं प्रतीक अशी ओळख असणारी एक आश्चर्यकारक वास्तू म्हणजे ताजमहाल. आग्रा येथे अतिशय दिमाखात उभ्या असणाऱ्या या वास्तूनं गेली कैक वर्ष जणू इतिहासच जीवंत करून आपल्यासमोर मांडला. अशी ही वास्तू नेमकी कशी साकारली गेली, त्यासाठी किती खर्च आला यासंदर्भातील अनेक संदर्भ आजवर सांगितले गेले.
ताजमहाल बांधणाऱ्या मजुरांचे हात छाटण्यापासून असे इतरही संदर्भ होते जे लक्ष वेधून गेले. अशा या जगभरात आश्चर्यानं उल्लेखल्या जाणाऱ्य़ा वास्तूला साकारतानाचा काळ नेमका कसा होता, कच्चा माल या वास्तूपर्यंत कसा आणला गेला हे सर्वकाही दाखवणारा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.
jauprints या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, AI चा उत्तम वापर नेमका कसा करता येतो हेच या व्हिडीओच्या माध्यमातून पाहता येत आहे. कृष्णधवल छटेमध्ये असणाऱ्या या व्हिडीओमध्ये वर्षानुवर्षे कशा पद्धतीनं ताजमहाल साकारण्यासाठी कच्चा माल आणला गेला, कशा पद्धतीनं मोठाले खडक या वास्तूच्या उभारणीसाठी रचले गेले आणि यासाठी प्राण्यांपासून मनुष्यबळाचा नेमका कसा वापर करण्यात आला याचं चित्रण व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं आहे.
हेसुद्धा वाचा : Opinion Poll : मतदानाआधीच अनपेक्षित आकडे समोर; सत्तेत मविआ की महायुती? पाहा निवडणूक निकालांचा पहिला अंदाज
तंत्रज्ञानाचा वापर केल्यास नेमकं काय आणि किती कमाल साध्य होऊ शकतं, हे हा व्हिडीओ पाहताना लक्षात येतं. जवळपास 22 वर्षे मजुरांच्या प्रचंड मेहनतीनंतर ताजमहालसारखी अद्वितीय वास्तू साकारण्यात आली आणि शकतानुशकतं या वास्तूनं जगभरात प्रेमाचं प्रतीक सिद्ध केलं. अशी ही वास्तू तुम्ही कधी प्रत्यक्षात पाहिलीय?