नवी दिल्ली : विमान प्रवासाचं भाडं जास्त असल्याने तुम्ही विमानाने प्रवास करणं टाळता? मग, ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण, आता केवळ ९९ रुपयांमध्ये तुम्ही विमानाने प्रवास करु शकणार आहात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलेशियाची एअरलाइन्स एअर एशियाने स्वस्तात प्रवास करण्याची संधी नागरिकांना उपलब्ध करुन दिली आहे. अर एशियाने रविवारी डिस्काऊंट सेलची घोषणा केली आहे.


एअर एशियाच्या या ऑफरअंतर्गत नागरिकांना देशांतर्गत उड्डाणासाठी केवळ ९९ रुपये द्यावे लागणार आहेत. तर, आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी ४४४ रुपये मोजावे लागणार आहेत.


मात्र, एअर एशियाची ही ऑफर केवळ मर्यादित कालावधीसाठीच उपलब्ध आहे. या ऑफरमध्ये बुकिंग करणाऱ्या नागरिकांना मे २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीत प्रवास करता येणार आहे.


एअर एशियाच्या या ऑफरची बुकिंग रविवारी रात्रीपासून सुरु होणार आहे. एअर एशियाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, "देशांतर्गत प्रवासासाठी ९९ रुपये तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी ४४४ रुपये ग्राहकांना द्यावे लागणार आहेत. 


इतकेच नाही तर, जे प्रवासी कोलकाताहून मलेशियातील जोहर बाहरूचा प्रवास करु इच्छितात त्यांच्यासाठी बेस फेअर शुन्य असणार आहे.